19 September 2018

News Flash

फ्लिपकार्टच्या समर सेलचा शेवटचा दिवस

जाणून घ्या ऑफर्स

संग्रहित छायाचित्र

कोणत्याही सणाचा अथवा ऋतूचा फायदा घेत ऑनलाइन शॉपिंग कंपन्या आपल्या वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतात. नुकतीच फ्लिपकार्टने आपली समर स्पेशल ऑफर जाहीर केली होती, त्याचा आज शेवटचा दिवस आहे. आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने अनोखी अशी कूलिंग डेज ऑफर सुरु केली आहे. यामध्ये उन्हाळ्यात आवश्यक असणाऱ्या घरगुती उत्पादनांवर भरघोस सूट देण्यात आली आहे. यामध्ये कूलर, एसी, फ्रीज आणि पंखा यांसारख्या उपकरणांवर ६० टक्क्यांहून अधिक डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय तुम्ही त्यात पण जर तुम्ही विशिष्ट कंपनीचे डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला १० टक्के अधिक डिस्काऊंट मिळू शकणार आहे.

विशेष ऑफर्स

तुम्ही एकावेळी ३ पंखे खरेदी केल्यास १० टक्के डिस्काऊंट मिळेल तर २ पंखे खरेदी केल्यास ५ टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही २६ मार्चपर्यंत फ्लिपकार्टवरुन खरेदी केल्यास तुम्हाला फोन पे ते इलेक्ट्रिकसिटी बिल पे वर तब्बल २०० रुपयांची सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही अनेक गोष्टी नव्याने घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या ऑफरचा आणखी जास्त फायदा होणार आहे. तो म्हणजे सर्वात अधिक खरेदी करणाऱ्यांना जास्त डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये पहिल्या ३ लोकांना ४० हजारचे डिस्काऊंट मिळेल.

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25199 MRP ₹ 31900 -21%
    ₹3750 Cashback
  • Honor 9 Lite 64GB Glacier Grey
    ₹ 13975 MRP ₹ 16999 -18%
    ₹2000 Cashback

कूलर

मार्वल कंपनीच्या एअर कूलरची किंमत ७९०० रुपये असून फ्लिपकार्डच्या सेलवर हा कूलर ४४९९ रुपयांना मिळेल. म्हणजेच या कूलरवर फ्लिपकार्ट ४२ टक्के डिस्काऊंट देत आहे. तर उषा कंपनीच्या एअर कूलरची किंमत ४१९० असून त्यावरील डिस्काऊंटनंतर तो ३२८० रुपयांना मिळेल.

फ्रीज

इनटेक्स ९० लिटरच्या डायरेक्ट कूल सिंगल डोअर फ्रिज डिस्काऊंटनंतर ७,९९९ रुपयांना मिळू शकेल. याची किंमत ९,२०० आहे. वरपूल कंपनीचा डायरेक्ट कूल सिंगल डोअर फ्रिज डिस्काऊंटनंतर १०,७४० रुपयांना मिळेल.

First Published on March 26, 2018 6:23 pm

Web Title: flipkart summer sale last day today offers on electronic goods