News Flash

Fashion : उन्हाळ्यात सौंदर्य खुलवणारी ‘फ्लोरल फॅशन’

फ्रेश समर लूकसाठी तुमचा वॉर्डरोब अपडेट करा किंवा जुने फ्लोरल प्रिंटचे कपडे असतील तर ते पुन्हा वापरात काढा आणि त्याला नवीन ट्विस्ट द्या.

दीपिका पदुकोण

फॅशनमधली एखादी पद्धत, एखादा ट्रेण्ड जुना होतो आणि काही काळानंतर तो पुन्हा चर्चेत येतो. उदाहरण द्यायचे झाल्यास पोलका डॉट फॅशन असो किंवा बेल बॉटम जीन्स. अशीच एक जुनी फॅशन सध्या चांगलीच ट्रेण्ड होत आहे ती म्हणजे फ्लोरल प्रिंट. कपड्यांसोबतच अॅक्सेसरीजमध्येही फ्लोरल प्रिंटची ट्रेण्ड पाहायला मिळते. समर लूकसाठी फ्लोरल प्रिंट उत्तम पर्याय असून तुमच्या सौंदर्यात आणखी भर पडेल यात काही शंका नाही.

वाचा : तजेलदार चेहऱ्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

फ्लोरल प्रिंटमध्ये बरेच रंग आणि प्रकार बाजारात उपलब्ध आहे. तुमच्या बॉडी टाइपप्रमाणे फुलांच्या प्रिंटची साइज आणि रंग तुम्ही निवडू शकता. पास्टल शेड्समधील फ्लोरल प्रिंट कपडे समर लूकसाठी परफेक्ट ठरतात. तर फ्लोरल प्रिंट घागऱ्यामध्येही अनेक नवनवीन बदल होत आहेत. कोणतंही नक्षीकाम किंवा डिझाइन नसलेल्या घागऱ्यावर फ्लोरल किंवा प्रिंटेड ब्लाऊज आणि फ्लोरल घागऱ्यावर सिल्क, वेल्वेटचे प्लेन ब्लाऊज असं कॉम्बिनेशन फार प्रचलित आहे. तर साड्यांमध्येही फ्लोरल प्रिंट ट्रेण्ड होत आहे.

फ्रेश समर लूकसाठी तुमचा वॉर्डरोब अपडेट करा किंवा जुने फ्लोरल प्रिंटचे कपडे असतील तर ते पुन्हा वापरात काढा आणि त्याला नवीन ट्विस्ट द्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 3:02 pm

Web Title: floral print fashion trending again in summer try this unique fashion
Next Stories
1 कॅल्शियमच्या कमतरतेवर अशी करा मात
2 Audi ला टक्कर देण्यासाठी भारतात दाखल होणार BMW ची स्पोर्ट्स कार
3 Ford इकोस्पोर्ट कारचे नवे एडिशन दाखल
Just Now!
X