05 June 2020

News Flash

क्वारंटाईनमध्ये काय खावं अन् काय टाळावं ? WHO च्या सुचना

करोनापासून वाचण्यासाठी लाखो लोक क्वारंटाईनमध्ये आहेत...

करोना व्हायरसमुळे जगभरात भितीचं वातावरण आहे. लाखो लोक या व्हायरसच्या विळाख्यात आले आहेत. तर हजारो नागरिकांनी जीव गमावला आहे. या रोगावर अद्याप कोणतीही लस किंवा औषधं उपलबद्ध नाही. आतापर्यंत या रोगातून ठीक झालेल्या रूग्णांचा विचार केल्यास रोगप्रतिकारशक्ती एवढा एकच उपाय आहे. या महामारीपासून वाचवण्यासाठी नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. अशावेळी नागरिकांनी काय खावं आणि काय टाळावं याबाबत जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं काही सूचना जारी केल्या आहेत….

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, क्वारंटाईनमध्ये असताना पॅकेटबंद, डब्बाबंद पदार्थ, मीठ आणि साखरेचे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. घरत तयार केलेले ताजे अन्नाचे सेवन करावे. जे आरोग्यदायी आणि पौष्टिक असावे. चहा आणि कॉफीमुळे पोटी समस्या उद्भवू शकते त्यामुळे जास्त प्रमाणात त्याचं सेवन करू नये.

आणखी वाचा : क्वारंटाइनमध्ये काय खाल? या तीन गोष्टी वापरुन बनवता येतील २५ हून अधिक पौष्टीक पदार्थ

क्वारंटाईनमध्ये आपला दररोजचा आहार हा पौष्टिक असावा. आहारात जास्तीत जास्त फायबर फ्रुट्स जसे की, भाज्या, फळे, डाळी, तसेच ओट्स, ब्राउन पास्ता, ब्राऊन राईस, क्विनोआ, संपूर्ण गहू ब्रेड इत्यादी अधिकाधिक फायदेशीर पदार्थ खावेत जे सहज पचतात. जेवणानंतर गूळ किंवा बडीशेप घ्या. यामुळे अन्न पचविणे सोपे होईल.

क्वारंटाईनमध्ये असताना सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात प्यावे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरात कमीतकमी ८-९ ग्लास पाणी प्यावं. तसेच, शक्य असल्यास एक ग्लास लिंबूपाणी, एक ग्लास ज्यूस किंवा एक ग्लास दूध प्यावं. तसेच काकडी, गाजर, पेपरमिंट, लॅव्हेंडर, रोझमेरी आणि बेरी जेवणाबरोबर खावं.

WHO च्या गाइडलाइननुसार क्वारंटाईनमध्ये असताना दारूचं सेवन करू नये. अल्कोहोलमुळे करोनाचा धोका वाढतो. रिफाईंड धान्ये जसे मैदा, पांढरा पास्ता, पांढरा तांदूळ आणि पांढरा ब्रेड इत्यादींचे सेवन करू नये. लाल आणि चरबीयुक्त मांस, लोणी, फुल फॅट दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ, पाम तेल, नारळ तेलाचे सेवन कमी केले पाहिजे. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी फळांचा समावेश करा. हे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 11:04 am

Web Title: food and nutrition during self quarantine what to choose and how to eat healthily nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 क्वारंटाइनमध्ये काय खाल? या तीन गोष्टी वापरुन बनवता येतील २५ हून अधिक पौष्टीक पदार्थ
2 Coronavirus: स्मार्टफोनवर किती काळ राहतो करोना विषाणू?; ‘ही’ माहिती वाचून धक्का बसेल
3 Coronavirus: असाही परिणाम… WhatsApp नाही, TikTok नाही तर हे ठरलं नंबर वन अ‍ॅप
Just Now!
X