24 February 2021

News Flash

24 हजारांनी स्वस्त झाला Samsung Galaxy S21 Ultra 5G, मर्यादित कालावधीसाठी ऑफर

मर्यादित कालावधीसाठी किंमतीत 24 हजार रुपयांची कपात...

सॅमसंग कंपनीने गेल्या महिन्यातच आपला प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S21 Ultra 5G लाँच केला होता. आता लाँचिंगच्या अवघ्या एका महिन्यातच कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे हा फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. पण किंमतीतील कपात मर्यादित कालावधीसाठीच असणार आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ‘Fab Phones Fest’ सेलमध्ये हा फोन 24 हजार रुपयांच्या भरघोस डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. अ‍ॅमेझॉनवर ‘Fab Phones Fest’ सेल आजपासून सुरू झाला असून 25 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असेल. सेलमध्ये Samsung Galaxy S21 Ultra 5G या फोनवर 24 हजार रुपये डिस्काउंट दिलं जात आहे. कंपनीने 1 लाख 5 हजार 999 रुपयांमध्ये Samsung Galaxy S21 Ultra 5G हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसह लाँच केला होता. मर्यादित कालावधीसाठी 24 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह हा फोन 81 हजार 999 रुपयांत खरेदी करता येईल.  मात्र फोनच्या 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिअंटवर किती डिस्काउंट मिळेल याबाबत अद्याप अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर किंमत अपडेट झालेली नाही.

Samsung Galaxy S21 Ultra 5G स्पेसिफिकेशन्स :-

Samsung Galaxy S21 Ultra 5G फोनमध्ये 6.8 इंचाचा डायनॅमिक एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये exynos 2100 प्रोसेसर असून इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. गॅलेक्सी एस21 अल्ट्रामध्ये 12 जीबी रॅम आणि 16 जीबी रॅमसोबत अनुक्रमे 256 जीबी व 512 जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय मिळतो. नावानुसारच हा फोन 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. या फोनची खासियत म्हणजे मागील बाजूला असलेला 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा. 108 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसोबत मागील बाजूला 10 मेगापिक्सेल ऑप्टिकल टेलिफोटो लेन्स, 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 10 मेगापिक्सेल ऑप्टिकल सुपर टेलिफोटो लेन्स आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 40 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सरही मिळेल. याशिवाय अँड्रॉइड 11 वर कार्यरत असलेल्या या डिव्हाइसमध्ये 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरीही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 12:09 pm

Web Title: for a limited period samsung galaxy s21 ultra 5g will be available with discount of rs 24000 sas 89
Next Stories
1 आज लाँच होणार बहुप्रतिक्षित Tata Safari, किती असणार किंमत?
2 Jio ची जादू संपली? Airtel ने सलग पाचव्या महिन्यात केली मात
3 Nokia 3.4 : लेटेस्ट ‘बजेट’ फोनची आजपासून विक्री सुरू, किंमत 11 हजार 999 रुपये
Just Now!
X