News Flash

नववर्षातील पहिलं ‘ब्रेकअप’! वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑटो सेक्टरसाठी आली ‘बॅड न्यूज’

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या 'ऑटो सेक्टर'साठी बॅड न्यूज

(संग्रहित छायाचित्र)

नववर्षाचा पहिलाच दिवस देशाच्या ऑटो सेक्टरसाठी बॅड न्यूज घेऊन आलाय. अमेरिकेची आघाडीची कार कंपनी फोर्डने (Ford Motor Company) भारतातील प्रमुख कार कंपनी महिंद्रा अँड महिंद्रासोबतचा (Mahindra & Mahindra) आपला पूर्वनियोजीत ऑटोमोटिव्ह संयुक्त उपक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

परस्परांशी चर्चा करुन हा उपक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं फोर्ड कंपनीने म्हटलं आहे. मात्र, ऑटोमोटिव्ह संयुक्त उपक्रम रद्द करण्याबाबत दोन्ही कंपन्यांनी कोणतेही संयुक्त निवेदन दिले नाही. दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्र निवेदनाद्वारे करार रद्द होत असल्याची माहिती दिली आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : वाहनधारकांना FASTag सक्ती कशासाठी आणि नियमावली काय?

कारण काय?
जागतिक महामारीमुळे काही प्रमाणात जगाच्या आर्थिक आणि व्यवसायिक परिस्थितीत मूलभूत बदल झाल्यामुळे करार रद्द करण्यात आल्याचं दोन्ही कंपन्यांकडून निवेदनाद्वारे सांगण्यात आलं आहे. महिंद्रा आणि फोर्ड या दोन कंपन्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये यासंबंधीत एक करार केला होता, त्याचा कालावधी 31 डिसेंबर 2020 रोजी संपला. जागतिक महामारीमुळे जगाची आर्थिक परिस्थिती आणि व्यवसायावर झालेल्या परिणामामुळे हा निर्णय घेतल्याचं फोर्डने सांगितलं. यासोबतच भारतातला आपला स्वतंत्र व्यवसाय आधीप्रमाणेच सुरू राहिल असंही फोर्डकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, करार रद्द झाल्याचा आमच्या योजनांवर काही परिणाम होणार नाही असं महिंद्राने म्हटलं आहे. दरम्यान, ऑटो सेक्टरमधील दोन दिग्गज कंपन्यांनी अचानक उपक्रम रद्द केल्याने ऑटो सेक्टरमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 12:34 pm

Web Title: ford and mahindra scraps previously announced automotive joint venture sas 89
Next Stories
1 शिक्षण मंत्र्यांनी परीक्षेच्या तारखांची घोषणा करताच ‘क्रॅश’ झाली CBSE ची वेबसाइट
2 व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी 17 तासांचा बॅकअप, भारतात लाँच झाला नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन
3 Reliance Jio ने केली मोठी घोषणा, ग्राहकांना दिलं नववर्षाचं जबरदस्त ‘गिफ्ट’
Just Now!
X