Ford कंपनीने आपली हॅचबॅक कार Figo च्या किंमतीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने Figo चं बेस मॉडेल (सुरूवातीचं मॉडेल) वगळता अन्य सर्व व्हेरिअंट्सच्या किंमती 39 हजार रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. तर, बेस व्हेरिअंट Ambiente च्या किंमतीत जवळपास 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

फोर्डने मार्च महिन्यात फिगो कारचं फेसलिफ्ट व्हेरिअंट लाँच केलं होतं. लाँचिंगवेळी 5.15 लाख रुपये इतकी या व्हेरिअंटची किंमत होती. मात्र आता किंमतीत झालेल्या बदलांमुळे Ambiente पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 5.23 लाख रुपये आणि Ambiente डिझेल व्हेरिअंटची किंमत 6.13 लाख रुपये झाली आहे.

किंमत कमी झाली –
बदललेल्या किंमतीनंतर आता फिगोच्या Titanium पेट्रोल आणि Titanium Blu पेट्रोल मॉडेलच्या किंमती 39 हजार रुपयांनी कमी झाल्या असून अनुक्रमे 6 लाख व 6.65 लाख रुपये इतकी नवी किंमत असणार आहे. तर या दोन्ही मॉडेलच्या डिझेल व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 6.90 लाख रुपये आणि 7.55 लाख रुपये झाली आहे. फिगोचं ऑटोमॅटिक व्हेरिअंट Titanium AT पेट्रोलची किंमत 39 हजार रुपयांची घट झाल्याने 7.70 लाख रुपये झाली आहे.

इंजिन – 
नव्या फोर्डमध्ये इंजिनचे तीन पर्याय उपलब्ध आहेत. यातील एक 1.2-लिटरचं 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 95 bhp पावर आणि 120 Nm टॉर्क जनरेट करतं. दुसरं 1.5-लिटरचं 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 121 bhp पावर आणि 150 Nm टॉर्क जनरेट करतं. फिगोचं डिझेल इंजिन 1.5-लिटरचं आहे, हे इंजिन 99 bhp पावर आणि 215 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यामध्ये 5-स्‍पीड मैन्‍युअल आणि 6-स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचा पर्याय उपलब्ध आहे.