लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेम ‘फोर्टनाइट’ (Fortnite) खेळणाऱ्यांसाठी वाइट बातमी आहे. कारण, हा गेम अ‍ॅपल आणि गुगलने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे.

अ‍ॅपलने आपल्या अ‍ॅप स्टोअरवरुन आणि गुगलने प्ले-स्टोअरवरुन फोर्टनाइट गेम हटवला आहे. फोर्टनाइट गेम बनवणाऱ्या एपिक गेम्सने युजर्सना पेमेंट करण्यासाठी थेट पर्याय दिल्यामुळे अ‍ॅपल आणि गुगलने ही कारवाई केली आहे.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
How To Make Kharvas At Home With 1 Cup Milk Without Chikacha Dudh
१ वाटी दुधात बनवा विना चिकाचा खरवस; ‘ही’ सिक्रेट पेस्ट वाचवेल वेळ, मास्टरशेफचा स्पर्धक सॅमची रेसिपी, पाहा Video

कारण, फोर्टनाइटची नवीन डायरेक्ट पेमेंट सिस्टिम अ‍ॅपल आणि गुगलसाठी फायदेशीर नाही. फोर्टनाइट हा गेम फ्रीमध्ये उपलब्ध असतो. पण, अतिरिक्त शस्त्र आणि साहित्य विकत घेण्यासाठी युजर्सना पैसे भरावे लागतात. युजर्सने गेममध्ये अतिरिक्त साहित्य पैसे देऊन खरेदी केल्यास त्या पैशांमधून गुगल आणि अ‍ॅपल ३० टक्के रक्कम कापून घेत असते.

मात्र, गुरूवारी फोर्टनाइट गेमच्या डेव्हलपर्सनी अ‍ॅपल आणि अँड्रॉइड दोन्ही युजर्सना डायरेक्ट पेमेंट करण्याचा पर्याय गेममध्येच दिला. त्यानंतर नपल आणि गुगलने पॉलिसीचं उल्लंघन केल्याचं सांगत हा गेम आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे.

गेम हटवण्यात आला असला तरी, अँड्रॉइड युजर्स हा गेम एपिक गेम्स अ‍ॅप किंवा सॅमसंगच्या गॅलेक्सी स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात. मात्र, आयफोन युजर्ससाठी सध्या कोणता पर्याय उपलब्ध नाहीये.