X

५ रुपयांचं चॉकलेट खा, जिओचा 1 GB डेटा मिळवा

यात डेअरी मिल्क क्रॅकल, डेअरी मिल्क रोस्ट बदाम, डेअरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट आणि डेअरी मिल्क लिकेबल्स यांचा समावेश आहे. याची किंमत ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहे.

मोबाईल कंपन्या बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आणि बाजारातील स्पर्धेत स्वत:ला आघाडीवर ठेवण्यासाठी एकाहून एक उत्तम शक्कल लढवतात. नुकताच जिओने एक आकर्षक प्लॅन आणला असून त्यामध्ये कंपनीने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे तोंड गोड करण्याबरोबरच कंपनी तुम्हाला इंटरनेट डेटाही देणार आहे. जिओला बाजारात येऊन दोन वर्षे पूर्ण होत आल्याने कंपनीने ही अनोखी ऑफर आणली आहे. यामध्ये जिओ आपल्या यूजर्ससाठी ५ रुपयांच्या चॉकलेटसोबत १ जीबी डेटा देत आहे. हा डेटा ४ जी असेल असे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे जिओने कॅडबरीसोबत टायअप केले आहे.

या मोफत डेटासाठी कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचे रॅपर लागणार आहे. त्यावर असलेला बारकोड स्कॅन केल्यावर तुम्हाला डेटा मिळणार आहे. ही ऑफर कंपनीने आपल्या ठराविक उत्पादनांवर लागू केली आहे. यात डेअरी मिल्क क्रॅकल, डेअरी मिल्क रोस्ट बदाम, डेअरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट आणि डेअरी मिल्क लिकेबल्स यांचा समावेश आहे. याची किंमत ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहे. यामध्ये जिओने आणखी एक सुविधा दिली आहे. मोफत डेटासोबत रिलायन्स जिओने ही ऑफर घेणाऱ्या युजरला दुसऱ्या जिओ सबस्क्रायबरला फ्री डेटा ट्रान्स्फरची सुविधा दिली आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या युजलाही डेटा देऊ शकता. ही सुविधा ३० सप्टेंबरपर्यंत लागू आहे. मात्र त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये MyJio अॅप असणं गरजेचं आहे.

कसा मिळवाल डेटा

१. माय जिओ अॅपच्या होमस्क्रिनवर मोफत डेटा ऑफरचा बॅनर लाईव्ह झाला आहे, त्यावर क्लिक करा.

२. त्याठिकाणी असणाफ्या Participate Now बटणावर क्लिक करा.

३. यानंतर डेअरी मिल्कच्या रिकाम्या पाकीटावरील बारकोड स्कॅन करा. मग तुम्हाला हा मोफत डेटा मिळेल.