गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय गेम PUBG Mobile पुन्हा एकदा चर्चेत आहे, कारण लवकरच या गेमचं भारतात पुनरागमन होणार आहे. पण अशातच PUBG Mobile गेमला एक झटकाही बसलाय. गॅरेना फ्री फायर या ऑनलाइन बॅटल गेमने PUBG Mobile गेमवर मात करत मोबाइल गेम ऑफ द ईयरचा खिताब आपल्या नावे केला आहे. गॅरेना फ्री फायरने PUBG Mobile आणि Call of Duty: Mobile यांसारख्या लोकप्रिय मोबाईल बॅटल रॉयल गेम्सवर मात करत या ईस्पोर्ट्स खिताबावर आपलं नाव कोरलं आहे.

आणखी वाचा : (PUBG Mobile India च्या वेबसाइटवर आली गेमची डाउनलोड लिंक, पण…)

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
The Phenom Story Music Surili Maithili thakur YouTube channel
फेनम स्टोरी: सुरिली मैथिली
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Phulala Sugandh Maticha fame actress aditi deshpande will play role in Lagnachi Bedi marathi serial
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

22.5 कोटी डाउनलोड :
मोबाइल गेम ऑफ द ईयर ठरल्यानंतर गॅरेना फ्री फायरने आपल्या फेसबुक पेजवरुन आनंद व्यक्त केला असून गेमच्या प्लेयर्सचे आभार मानलेत. गेम इंस्टॉल करण्यासाठी कमी स्टोरेज आणि बजेट फोनमध्येही सहजपणे खेळता येत असल्याने फ्री फायरची लोकप्रियता वाढली. म्हणजेच गेम खेळण्यासाठी प्लेयर्सना प्रीमियम किंवा दर्जेदार फिचर्स असलेल्या फोनची आवश्यकता नसते. तसेच याचा गेम-प्ले देखील पब्जी मोबाईलप्रमाणे दीर्घकाळाचा नाहीये. गेममध्ये छोट्या मॅच असतात, त्यामुळे मॅच संपण्यास जास्त वेळ लागत नाही. याशिवाय भारताने पबजीवर घातलेली बंदीही फ्री फायरच्या पथ्यावर पडल्याचं म्हटलं जातंय. Sensor Tower च्या रिपोर्टनुसार, फ्री फायर या वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत 225 मिलियन म्हणजेच जवळपास 22.5 कोटी डाउनलोड झाला आहे.

या गेम्ससोबत होती स्पर्धा :
मोबाईल गेम ऑफ द ईयरच्या शर्यतीत गॅरेना फ्री फायरची टक्कर पब्जी मोबाईल, Call of Duty: Mobile, क्लॅश ऑफ क्लॅन्स, मोबाईल लिजेंड्स, क्लॅश रॉयल ( Clash Royale), ब्रॉल स्टार्स (Brawl Stars ) आणि Arena of Valor यांसारख्या लोकप्रिय गेम्ससोबत होती.