महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी आपल्या सोबत असणाऱ्या मित्राच्या (रुममेट्स) मानसिक समस्यांबाबत संवेदशील असतात. यामुळे मित्राला आलेला मानसिक ताण काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता असते, असे एका अभ्यासात आढळले आहे.

महाविद्यालयामध्ये एकत्र असलेल्या मित्रांमधील एखाद्यास मानसिक त्रास होत असेल तर सोबतीला असणाऱ्या मित्रांची फार मोठी मदत होते. यामुळे मानसिक त्रास असणाऱ्यावर योग्य ते लक्ष ठेवणे सुलभ जाते, असे संशोधकांनी सुचवले आहे. मात्र यामध्ये मानसिक त्रास अचूकपणे ओळखण्यासाठी त्यांना योग्यरीत्या प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे संशोधनामध्ये म्हटले आहे.

महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राला होत असलेला मानसिक त्रास एका पातळीपर्यंत शोधून काढला. आणि त्यामध्ये मुलामध्ये काही महिन्यांमध्ये आवश्यक तो सकारात्मक बदल दिसून आला, असे अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या पॅट्रिक रोआऊट यांनी म्हटले.

जर मानसिक तणाव वाढला तर त्यामधून आपल्या मित्राला कशा प्रकारे बाहेर काढायचे याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले. या अभ्यासासाठी १८७ महाविल्यालयीन विद्यार्थ्यांवर संशोधन करण्यात आले. या संशोधनात शैक्षणिक वर्षांमध्ये मित्रांसोबत राहणाऱ्यांचा मानसिक ताण किती प्रमाणात कमी होते, याचा अभ्यास करण्यात आला.