News Flash

Friendship Day : नक्की कधी, कुठे आणि कसा सुरू झाला फ्रेंडशिप डे? जाणून घ्या इंटरेस्टिंग इतिहास!

मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु

world friendship day, Friendship Day 2021
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. (Photo: Unsplash)

मैत्रीचा हा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणार्‍या काही व्यक्ती म्हणजे आपले बेस्ट फ्रेंड्स. खरं तर ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी आला आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना, जवळील सहकाऱ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्यासोबत काही खास वेळ घालवून सेलिब्रेशन केले जातं.

दरम्यान यंदा अजूनही कोरोनाचं संकट पूर्णपणे शमलेले नाही. त्यामुळे असे लहान लहान दिवस सेलिब्रेट करून एकमेकांना पुन्हा नव्याने जोडण्याची संधी दडवू नका. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे आता अंतर बरंच कमी झालेलं आहे. मग आज Facebook Messages, WhatsApp Status, Stickers, Quotes, HD Images यांच्या द्वारा नॅशनल बेस्ट फ्रेंड्स डे च्या शुभेच्छा शेअर करायला मुळीच विसरू नका.

मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते.

‘फ्रेंडशिप डे’चा इतिहास

असेही म्हटले जाते की, १९३५ मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता. ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या मित्राने नंतर मित्राच्या आठवणीत आत्महत्या केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस International Friendship Day म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला होता. त्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल २१ वर्षांनी १९५८ मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला. यानंतर अमेरिकेच्या सरकारने हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे घोषित केलं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 30 जुलै या दिवशी अधिकृतरित्या मैत्री दिवस साजरा केला जातो. आणि भारतात ऑगस्ट महिन्यात येणारा प्रथम रविवार या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 11:57 am

Web Title: friendship day 2021 when is friendship day know the date history friendship day scsm 98
Next Stories
1 मधल्या वेळेत खूप भूक लागते? मग नक्की ट्राय करा ‘हे’ पौष्टिक पर्याय
2 करोनानंतर आता नॉरोव्हायरस? जाणून घ्या लक्षणांपासून उपचारापर्यंत संपूर्ण माहिती 
3 ‘अ‍ॅप’वरील सावकारीला  चाप!
Just Now!
X