उन्हाळा आल्यावर मामाच्या गावाला जाऊन रानमेवा खाण्याचे वेध शहरातील चाकरमनी मंडळींना लागतात, पण यंदा अवकाळी पावसामुळे रानमेवा दुर्मीळ बनला असल्याचे चित्र उभे राहिले आहे. रानमेवा त्यामुळे महागणार आहे.
यंदा अवकाळी पाऊस कोसळल्याने आंबा, फणस, काजू, कोकम, जांभूळ, करवंद अशा कोकणातील विविध चविष्ट रानमेव्यासह फळावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी फळझाडे झडून गेली आहेत तर अनेक ठिकाणी रानमेव्यासह फळझाडे उशिराने पीक देणार आहेत.
रानमेवा जंगलाच्या बेसुमार तोडीमुळे दुर्मीळ बनला आहे. करवंद म्हणजेच काळी मैना आणि जांभूळ औषधी म्हणूनही ओळखली जातात.
रानमेवा व फळे यंदा अवकाळी पावसामुळे महागणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात चविष्ट मानल्या जाणाऱ्या या रानमेव्याची मेजवानी चाकरमानी लोकांना दुर्मीळ असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा बाजारात रानमेवा मिळतोय, पण तो दुर्मीळ बनत चालला असल्यासारखे चित्र उभे राहिले आहे. आंबा कापून त्याची फोड खाणारे भरपूर असतात, पण सध्या तो पिकतो तेथे दुर्मीळपणे मिळत आहे, असे बोलले जात आहे.