25 November 2020

News Flash

पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या झोपेचा कालावधी काहीसा कमी

पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या झोपेचा कालावधी काही मिनिटे कमी असण्याची शक्यता असते

| April 18, 2016 02:04 am

पौर्णिमेच्या रात्री मुलांच्या झोपेचा कालावधी काही मिनिटे कमी असण्याची शक्यता असते असे भारतासह १२ देशांमधील मुलांबाबत करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.

तथापि, पौर्णिमेच्या दिवशी मुले अतिसक्रिय असतात असे मानले जात असले तरी पौर्णिमा असणे आणि मुलांच्या कार्यकलापाचा स्तर (अ‍ॅक्टिव्हिटी लेव्हल) यांचा संबंध या अभ्यासात सिद्ध होऊ शकला नाही.

कॅनडातील चिल्ड्रन्स हॉस्पिटल ऑफ ईस्टर्न ओंटारिओ रिसर्च इन्टिटय़ूटमधील संशोधकांनी ९ ते ११ वर्षे वयोगटातील सुमारे ५८०० मुलांबाबतच्या माहितीचे विश्लेषण केले. ही मुले भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, कोलंबिया, फिनलंड, केनया, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन व अमेरिका या देशांमधील होती.

प्रयोग करण्यात आलेल्या मुलांनी ‘फिटनेस ट्रॅकर’सारखी ‘अ‍ॅक्सिलकोमीटर्स’ ही उपकरणे घातली होती. या उपकरणाच्या मदतीने शरीराच्या हालचालींची नोंद होऊन ती किमान सात दिवस आणि दररोज २४ तास झोपेवर देखरेख ठेवता येते.

मुले उच्च आणि कमी तीव्रतेच्या हालचाली करण्यात जेवढा वेळ घालवतात आणि त्यांचा बैठा वेळ यासह त्यांच्या ‘अ‍ॅक्टिव्हिटी लेव्हल्स’ पौर्णिमेला आणि अमावास्येनंतरच्या पहिल्या दिवशी सारख्याच असतात, असे निष्कर्ष यातून मिळाले. तथापि, ‘न्यू मून’च्या रात्रींशी तुलना करता पौर्णिमेच्या रात्री त्यांचा झोपेचा कालावधी ५ मिनिटांनी कमी असतो, असे ‘लाइव्ह सायन्स’ने नमूद केले आहे. हा कालावधी मुलांच्या झोपेच्या एकूण वेळेच्या सुमारे १ टक्का आहे.

पौर्णिमेच्या चंद्राची प्रकाशमानता मुलांची झोप चाळवते हे त्यामागील एक संभाव्य कारण असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘फ्रंटियर इन पीडियाट्रिक्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2016 2:04 am

Web Title: full moon night childrens sleep duration
Next Stories
1 वनस्पतिजन्य तेलांनी हृदयविकाराचा धोका कायम
2 वाताच्या आजाराचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक
3 पोटातील जिवाणू कर्करोग नियंत्रणावर उपयुक्त
Just Now!
X