News Flash

Ganapati Utsav 2019 : असे करा ड्रायफ्रूट मोदक

हेल्दी आणि घरातील सगळे खाऊ शकतील असे आगळेवेगळे मोदक

काही सण आणि पदार्थ यांचं नातं अतूट असतं. होळी म्हटली की पुरणाची पोळी, संक्रांतीला तिळाचे लाडू तसं गणेश चतुर्थीला मोदक हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपतीबाप्पांच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांच्या डोळ्यांसमोर २१मोदकांचं ताट तरळू लागतं. बाप्पा आणि त्याचे प्रिय मोदक यांचं नातं पक्कं आहे. बाप्पाला आवडणारा आणि घरातील मंडळींना खुश करणारा मोदक गणपतची उत्सवात दररोज केले जातात. उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक आपल्याला माहित असतात पण त्याशिवायही थोडे हेल्दी आणि तरीही पारंपारिक मोदकासारखेच असणारा थोडा वेगळआ प्रकार तुम्ही नक्की ट्राय करु शकता. पाहुयात असाच थोडासा आगळावेगळा ड्रायफ्रूट मोदक

साहित्य :

तांदळाचे पीठ – दिड कप
मीठ – चवीनुसार
तेल – गरजेनुसार

सारणासाठी साहित्य :

किसलेला बदाम – पाव चमचा
खजुराचे तुकडे – अर्धा चमचा
कोरडे खोबरे – १०० ग्रॅम
आक्रोड – पाव कप
काजू – पाव कप
जर्दाळू – पाव कप
बेदाणे – पाव कप
केशर – गरजेनुसार
तूप – अर्धा चमचा
वेलची पावडर – चिमूटभर
साखर – पाव कप

कृती :

– प्रथम एका भांड्यात एक चतुर्थांश भाग पाणी घेऊन त्यात १ लहान चमचा तेल घालून हे पाणी गरम करावे.

– पाणी उकळत असताना त्यात हळूहळू तांदूळाचं पीठ घालून सतत एका बाजूने ढवळत रहावे. यावेळी पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

– पीठ या गरम पाण्यात चांगलं एकजीव झाल्यानंतर या भांड्यावर काही काळ झाकण ठेवा. ज्यामुळे पीठ गरम पाण्यात नीट एकजीव होऊन मोदकाला आवश्यक असलेली पारी तयार करण्यास सहज शक्य होईल.

– त्यानंतर हे पीठ एका मोठ्या परातीत घेऊन ते चांगलं मळून घ्यावं. यावेळी पीठ मळताना हाताच्या तळव्यांना तेल लावावे. जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही. त्यानंतर या पीठाचा मऊसर असा गोळा तयार करावा.

– यानंतर एका पातेल्यात शुद्ध तूप आणि वर दिलेले सारा सुकामेवा घालावा. त्यानंतर त्यात पीठीसाखर घालून काही वेळ मंद आचेवर गॅसवर गरम करावं. त्यानंतर तयार झालेलं सारण एका बाजूला काढून ठेवावं.

– आता तयार पीठाची लहानशी गोळी करुन त्याला हाताच्या तळव्याने थोडासा लहान पारीसारखा आकार द्यावा. यामध्ये एका चमच्याच्या सहाय्याने तयार सारण भरुन पीठाची पारी बंद करावी. ही पारी बंद करताना त्याला बोटांच्या सहाय्याने फुलांच्या पाकळीचा आकार द्यावा.

– पारीला फुलांचा आकार देत असताना हळूहळू या पारीचं तोंड बंद करावं. त्यानंतर मोदक तयार करण्याची पहिली पायरी पूर्ण होतं.

– मोदक तयार झाल्यानंतर एका मोदक पात्रात तळाला थोडसं पाणी घेऊन त्यावर मोदकपात्राच्या प्लेट्स ठेऊन मोदक ठेवावेत. हे मोदक १० ते १२ मिनीटे वाफवाते. त्यानंतर मोदक पात्राचं झाकणं काढून मोदक काढून घ्यावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 11:09 am

Web Title: ganapati utsav 2019 dry fruit modak recipe nck 90
Next Stories
1 पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास माहितीये का?
2 Ganapati Utsav 2019 : घरच्या घरी तयार करा चॉकलेटचे मोदक
3 Ganapati Utsav 2019 : जाणून घ्या पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व
Just Now!
X