26 February 2021

News Flash

Ganesh Chaturthi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा चॉकलेट मोदक

मोदक आणि चॉकलेट अशा दोन आवडत्या गोष्टी एकत्र आल्या तर

काही सण आणि पदार्थ यांचं नातं अतूट असतं. होळी म्हटली की पुरणाची पोळी, संक्रांतीला तिळाचे लाडू तसं गणेश चतुर्थीला मोदक हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपती बाप्पांच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांच्या डोळ्यांसमोर २१ मोदकांचं ताट तरळू लागतं. गणेश चतुर्थी, संकष्टी, विनायकी, एकादशीनिमित्ताने मोदक हवेतच. बाप्पा आणि त्याचे प्रिय मोदक यांचं नातं पक्कं आहे. त्यातही मोदक आणि चॉकलेट अशा दोन आवडत्या गोष्टी एकत्र आल्या तर विचारायलाच नको.

नक्की वाचा >> नेपाळचे ‘मोमो’, आफ्रिकेचे ‘बन्कू’ तर इटालीमधील ‘रॅव्हिओली’… अशी आहेत जगभरात पसरलेली मोदकाची भावंडे

चॉकलेट ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट. दिवसातील कोणत्याही वेळी चॉकलेट समोर आले तरीही आपण त्याला नाही म्हणून शकत नाही. काळाप्रमाणे याच चॉकलेटमध्ये बरेच बदल झाले. गणपतीच्या दिवसांत बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या आकारातही हे चॉलेट मोदक मिळू लागले आहेत. मात्र या विकतच्या मोदकांची किंमत जास्त असल्याने तसेच यंदा तर गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने बाहेरुन मोदक विकत घेण्याबद्दल मनात थोडी शंका असतेच. अशावेळी घरच्या घरी हे चॉकलेट मोदक करता आले तर? पाहूयात चॉकलेट मोदकांची सोपी आणि चटकन करता येईल अशी रेसिपी…

साहित्य :
पाव कप खवा (कोरडा करून घेतलेला)

पाव कप पिठीसाखर

दीड ते दोन चमचे कोको पावडर

कृती :
कोरडय़ा केलेल्या खव्यामध्ये पिठीसाखर एकत्र करून घ्या. एका वेळी एक चमचा कोको पावडर घाला. एकत्र करा. परत एकदा एक चमचा कोको पावडर घाला. मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवर कोको पावडर घाला. मिश्रण घट्ट झाले की, त्याला मोदकांप्रमाणे आकार द्या.

नक्की पाहा >> मंडप किंवा देव्हाऱ्यात नाही तर मागील ७०० वर्षांपासून ज्वालामुखीवर विराजमान झालेत हे गणपती बाप्पा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 6:01 pm

Web Title: ganesh chaturthi recipes chocolate modak recipe in marathi scsg 91
Next Stories
1 पाकिस्तानकडून भारताला पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी
2 डोवाल यांनी इजिप्तचा झेंडा पोस्ट करत भारतीयांना दिल्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा?; जाणून घ्या त्या पोस्टमागील सत्य
3 CCTV Footage : रस्त्यावरुन चालताना डोक्यात मांजर पडल्याने आजोबा जागीच बेशुद्ध पडले
Just Now!
X