गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांवर ताव मारला जातो. आता मोदक म्हटलं की गोडच असं समीकरण बनलंय. पण सतत गोड खाऊन नको होतं. तसंच सध्या कुटुंबात मधुमेही रुग्ण असतातच. त्यामुळे आरती झाल्यावरच्या नैवेद्याला किंवा जेवणाच्या ताटातही तिखट काहीतरी असावं असं वाटतं. आता तिखट मोदकंच करता आले तर? त्यातही भाज्यांचा वापर करुन हेल्दी आणि काहीसे टेस्टी मोदक बनवले तर सणावाराच्या दिवसांत सगळ्यांनाच त्याचा आनंद लुटता येईल.

साहित्य :

दीड कप मैदा

दोन चमचे तेल

अर्धा कप पालक पेस्ट

मीठ स्वादानुसार

सारण :

एक कप वाटाणे (उकडून वाटलेले)

एक मध्यम बटाटा(उकडलेला)

कोथिंबीर

एक चमचा लिंबू रस

एक चमचा साखर

मीठ

हळद, तिखट

मिरची-जिरे पेस्ट

कृती :

पालक उकडून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मैदा, तेल, मीठ, पालक पेस्ट एकत्र करून घट्ट पीठ मळा. कढईत तेल गरम करून त्यात वाटाणा, बटाटा व वरील सर्व मसाला घालून एकत्र करा. पालकाच्या कणकेचा छोटा गोळा घेऊन तो हातावरच जरा खोलगट करा. त्यात सारण भरून मोदकाप्रमाणे आकार देऊन तळून घ्या.