सुजैविकांनी युक्त असलेले चोथायुक्त अन्न सेवन केल्याने झोपेचा दर्जा सुधारतो, त्यात कच्चा लसूण, कांदा यांचे सेवन उपयुक्त ठरते. तसेच शारीरिक ताणही कमी होतो. असे नवीन संशोधनात म्हटले आहे. सुजैविकांमुळे आतडय़ातील चांगले जिवाणू सुरक्षित राहतात. अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठातील संशोधक रॉबर्ट थॉमसन यांनी म्हटले आहे की, सुजैविकेयुक्त नैसर्गिक अन्न आरईएमव्यतिरिक्त व आरईएमयुक्त झोप (रॅपिड आय मूव्हमेंट) सुधारते. ताणानंतरही झोपेचा दर्जा चांगला राहतो. कांदा, लसूण यामुळे चांगला फायदा होतो. जेव्हा उपकारक जिवाणू हे पदार्थ पचवतात तेव्हा त्यांची संख्या वाढते व त्यामुळे आतडय़ाचे आरोग्य सुधारून चयापचयातील त्याज्य घटक बाहेर टाकले जातात. संशोधकांनी तीन आठवडे उंदरांवर संशोधन केले असून त्यात त्यांच्या शरीराचे तापमान, आतडय़ातील जिवाणू व झोपेचे चक्र यांचा अभ्यास ईईजी तंत्राने करण्यात आला. ज्यांना प्रिबायोटिक अन्न देण्यात आले. त्यांची एनआरईएम झोप जास्त काळ टिकली. यात डोळे झोपेत जलद हालचाली करीत नाहीत. या उंदरांना ताण दिला असता त्यांची आरईएम झोप चांगली राहिली. जीवनात आधीच्या काळात जर प्रिबायोटिक घेतले तर त्याचा चांगला परिणाम होतो.

आरईएम झोप ही ताणाचे दुष्परिणाम टाळणारी असते. या झोपेमुळे मानसिक धक्क्यामुळे होणारे ताणाचे आजार जडत नाहीत. शरीराचे तापमानही यात नियंत्रित राहते. जर्नल फ्रंटियर्स इन बिहॅवरियल न्यूरोसायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश