News Flash

रात्रीच्या जेवणानंतर गॅसचा त्रास होतं आहे का? जाणून घ्या कारण आणि उपाय

रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गॅसची समस्या होते, जाणून घ्या हेस्थ टिप्स..

रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गॅसची समस्या होते.

आजकालच्या जीवनशैलीत फास्ट फूडचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यात अनेक लोक व्यायाम करणे टाळता. यामुळे रात्री झोपताना बऱ्याचदा अनेकांना अस्वस्थ वाटते. त्यामुळे व्यवस्थित झोप लागतं नाही आणि पचन नीट होतं नाही. खरतरं ही समस्या पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे होते. काही लोकं गॅसच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. परंतु कधीकधी ही समस्या खूप गंभीर होते.

जर शरीरातून गॅस पास झाला नाही तर झोप लागणार नाही. एवढंच नाही तर पोट दुखीचा त्रास होतो. आपल्याला काही खाण्याची इच्छा देखील होत नाही आणि पोटात जळजळ होते. रात्री झोपायला गेल्यानंतर लोकांना गॅसची समस्या होत असल्याचे जास्त प्रमाणात आढळून आले आहे. हे का होते आणि आपण गॅसच्या समस्या कशी दुर करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार

अन्न पचनाची प्रक्रिया सुरु असताना आपल्या शरीरात गॅसची निर्मिती होते. जर तुम्ही पचण्यास जड असलेल्या पदार्थांचे सेवन केले तर गॅस मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. किंवा तुम्ही रात्रीच्या वेळी गरजे पेक्षा जास्त जेवण केले तर ही समस्या उद्भवू शकते.

रात्री गॅसची समस्या टाळण्यासाठी काय करावे

१. अन्न पचन होण्यास जवळपास ६ तास लागतात. त्यामुळे झोपेच्या सुमारे ३ तासांपूर्वी जेवण करा.

२. ज्यांना रात्री गॅस तयार होण्याची समस्या असते त्यांनी रात्री हलका आहार घ्यावा.

३. रात्री फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थांचे सेवन करणे टाळा. कारण त्यांना पचण्यास वेळ लागतो आणि गॅस देखील तयार होतो. सोयाबीन, मटार, सफरचंद, भाज्या यांचे सेवन करणे टाळा कारण यात फायबरचे प्रमाण जास्त असते.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

४. रात्री जेवण झाल्याच्या अर्ध्या तासानंतर थोडावेळा बाहेर फिरायला जा.

५. भरपूर पाणी प्या. दिवसभरात तुम्ही कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी प्या.

६. दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात ६ तासाचे अंतर पाहिजे. हे अंतर कमी किंवा जास्त असेल तर गॅस होण्याची समस्या होते.

आणखी वाचा : तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा

७. उपाशी राहिल्याने गॅसची समस्या होते. त्यामुळे जर तुम्हाला संध्याकाळी किंवा मध्येच भूक लागली तर काही हेल्दी खा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 6:24 pm

Web Title: gastric problem before sleep this is the reason and solution dcp 98
टॅग : Health News,Lifestyle
Next Stories
1 वर्षभराच्या अखेरीस Noise लाँच करणार प्रीमियम स्मार्ट वॉच
2 वाहनांचे ‘आरोग्य’ही बिघडतंय!
3 तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा
Just Now!
X