अतिशय क्वचितपणे आढळणाऱ्या ‘अ‍ॅलर्जी’ या आजाराची लागण अनुवांशिकतेमुळेही होत असून तशा स्वरूपाची लक्षणे भारतीय वंशातील किमान एका तरी व्यक्तीत आढळून येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
धावणे, टाळ्या वाजवणे, सुखलेला टॉवेल किंवा अतिशय खराब रस्त्यावरून बसमधून केलेला प्रवासही त्वचेवर तात्पुरत्या स्वरूपाच्या सुरकुत्यांसोबतच पित्ताच्या गाठी तयार होण्यासाठीदेखील कारणीभूत ठरते. ज्यांना आरोग्याच्या परिभाषेत ‘व्हायब्रेटरी अर्टिकॅरिया’(अंगावर पसरणारे लाल रंगाचे पित्ताचे व्रण)असेही म्हटले जाते.
अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्था(एनआयएच)च्या संशोधकांना अभ्यासाअंती हेच आढळून आले की, अशा स्वरूपाचा विस्कळीतपणा हाच सामान्य पेशीमध्ये कंप घडविण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्वचेवर लाल रंगाचे वळ हे कंप पावल्यामुळे होणाऱ्या ‘व्हायब्रेटरी अर्टिकॅरिया’ या आजारांमध्ये आढळतात. त्यामुळे रुग्णांमध्ये नि:स्तब्ध होणे, डोके दुखणे, थकवा येणे, धुरकट दिसणे आणि तोंडाची चव आम्लयुक्त होणे यासारखी लक्षणे वारंवार आढळून येतात. या लक्षणांचा प्रभाव हा काही तासांपुरतीच असतो, मात्र प्रत्येक दिवशी त्याचा परिणाम हा ठरावीक काळाने आणि सातत्याने होत असते. या संशोधनात तीन वेगवेगळ्या कुटुंबाचा अभ्यास केला गेला. ज्यांच्या पिढय़ांमध्ये ‘व्हायब्रेटरी अर्टिकॅरिया’ या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. संशोधकांनी आरोग्य नियमावलीनुसार केलेल्या संशोधनातून पहिल्या कुटुंबातील कोणत्या स्वरूपाची कारणे ही ‘अर्टिकॅरिया’ या आजाराला कारणीभूत ठरतात यावर संशोधन केले. या वेळी मस्तकातील काही पेशी, ज्या त्वचा व रक्त पेशींशी निगडित द्रव आणि अन्य दाहक रसायनेही रक्तप्रवाह व त्या सभोवताली असलेल्या पेशींना पुरवत असतात. ज्याला डिगॅ्रन्युलेशन (विकनिकायण चाचणी) असेही संबोधण्यात येते. हे संशोधन ‘न्यू इग्लंड जनरल ऑफ मेडिसिन’मधून प्रकाशित झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)