वांशिक आणि पारंपरिक पाश्र्वभूमीचाही महिलांमधील स्तनांच्या कर्करोगावर प्रभाव असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. आफ्रिकन आणि अमेरिकन महिलांमध्ये आक्रमक स्वरूपाचा स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
जैवविज्ञान आणि आनुवंशिकता महिलांमध्ये कर्करोग विकसित करण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात. स्तनांच्या कर्करोगाचा प्रकार आणि
त्याचा टप्पा महत्त्वाचा नसून गौरवर्णीय महिलांपेक्षा अल्पसंख्याक महिलांना या कर्करोगाचा अधिक धोका असतो. मात्र, योग्य उपचार घेतल्यास स्तनांच्या कर्करोगाचा प्रभाव कमी करता येणे शक्य असल्याचेही या अभ्यासामुळे स्पष्ट झाले आहे.
आफ्रिकन आणि अमेरिकन महिलांमध्ये आक्रमक स्वरूपाचा स्तनांचा कर्करोग विकसित होण्याची शक्यता असते. या कर्करोगाला ‘ट्रिपल

निगेटिव्ह’ असे म्हणतात. या कर्करोगाचे उशिरा निदान झाल्यास उपचारासाठी अतिशय कमी पर्याय शिल्लक असतात.
फ्रेड हचिन्सन कॅन्सर रीसर्च सेंटर येथे लू चेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याविषयी संशोधन केले आहे. या अभ्यासात संशोधकांनी गौरवर्णीय आणि आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांचा अभ्यास केला. यामध्ये आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांना आक्रमक कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे निदान झाले. तसेच स्तनांच्या कर्करोगाच्या सर्व प्रकारांची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. या महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाच्या उपप्रकारांची लागण होण्याचे कारण त्यांची वांशिक पाश्र्वभूमी हे आहे, असे लू चेन यांनी स्पष्ट केले. या कर्करोगाचे निदान झाल्यावरही महिलांना सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विषमतेमुळे वैद्यकीय उपचार घेता येत नाहीत, असे चेन म्हणाले. १८ कर्करोग निदान केंद्रांवरील एक लाख दोन हजार चौसष्ट महिलांना स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आल्याची नोंद या अभ्यासात करण्यात आली आहे.