News Flash

दिवाळीसाठी घर सजवताय? मग हे वाचाच

थोडी अधिक काळजी घेतल्याने आपले घर केवळ उत्सवांपुरतेच नाही, तर कायमचेच आकर्षक व भक्कम राहू शकते.

खरंतर दिवाळी आता सुरुही झाली आहे. दिव्यांच्या या सणाला महाराष्ट्रात विशेष महत्त्व असून या काळात घराघरांत आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येण्याचे निमित्त असल्याने दिवाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच खास असते. घरी पाहुणे येणार म्हटल्यावर आपले घरही छान सजलेले असेल तर आनंदात निश्चितच भर पडते. पावसाळ्यात काहीवेळा घरांची स्थिती बिघडलेली असते. सततचा ओलावा आणि गळती यांचे डाग भिंतींवर आणि छतांवर उमटतात, रंगांचे पोपडे निघू लागतात, भिंती जुनाट दिसू लागतात. सर्वात वाईट म्हणजे ओलाव्यामुळे महागडे फर्निचर खराब होते. मात्र सण, उत्सवांच्या काळात घरे सुंदर दिसायला हवी असतात. त्यासाठी ‘डॉ. फिक्सिट’तर्फे डॉ.संजय बहादूर यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स ..

१. ओलसर जागांवर तातडीने उपाय करा : ओलाव्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घेऊन ओलाव्याचे मूळ कारण शोधून काढावे. त्या ओलाव्यामुळे भिंतीवर आलेली बुरशी घालवण्यासाठी काय करता येईल, याची त्या व्यावसायिकाशी चर्चा करावी. केवळ तात्पुरते उपाय योजून ते डाग अथवा बुरशी लपविण्याचे प्रयत्न हे नेहमीच फोल ठरतात. बुरशी तात्पुरती घालवली, तरी ती काही महिन्यांतच पुन्हा उगवते. त्यानंतर आपण घालवलेले पैसे फुकट गेल्याची जाणीव आपल्याला होते. त्यामुळे मूळ कारण शोधून काढून योग्य त्या उपायांनी ओलाव्याचे डाग आणि बुरशी घालवावेत व आवश्यक वाटल्यास भिंतीच्या त्या भागावर सुंदर वॉलपेपर लावावा, हे ठीक.

२. भिंतीवर साज चढवा ः सणासुदींच्या दिवसांमध्ये भिंतीवर पडलेले डाग कायमचे घालवण्यापेक्षा लपविण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यासाठी ते या डागांवर वॉलपेपर चिकटवतात किंवा वॉल हॅंगिंग टांगतात. खरे तर अशावेळी वॉटर प्रूफिंग करून त्या भिंतीची दुरुस्ती करून घेतली पाहिजे. त्यानंतर वाटल्यास त्या भिंतीवर आकर्षक वॉलपेपरने, वॉल हॅंगिंगने, दिव्यांच्या सजावटीने, म्यूरल वा चित्रांनी साज चढवावा.

३. बाहेरील भिंतीवरील भेगांची नीट काळजी घ्या ः इमारतीच्या वा घराच्या बाहेरील भिंतीवर अनेकदा भेगा पडलेल्या असतात. या भेगा बुजवून भिंती रंगविण्याकडे घरमालकांचा व सोसायट्यांचा कल असतो. मात्र ही केवळ तात्पुरती डागडुजीच म्हणता येईल. वॉटरप्रूफींग केल्याशिवाय या भेगा बुजविण्यात अर्थ नाही. या भेगा, कितीही छोट्या असल्या तरी, कालांतराने ओलावा पसरविण्याचे काम करतात आणि इमारतीच्या सांगाडयाचे कॉलम व बीम अशा महत्त्वाच्या भागांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे इमारत वर्षानुवर्ष भक्कम ठेवायची असल्यास या भेगांच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही.

घराच्या दुरूस्तीबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास, एखाद्या तज्ज्ञाचा, व्यावसायिकाचा सल्ला घेऊन स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे. त्यामुळे समस्यांचे मूळ कारण दूर करता येईल आणि योग्य उपाय केल्यामुळे संभाव्य अपघात वा दुर्घटना टाळता येतील. योग्य पध्दतीने केलेल्या वॉटरप्रूफींगमुळे संभाव्य नुकसान टळू शकते आणि घराचे मूल्यांकन चांगले राहते. थोडी अधिक काळजी घेतल्याने आपले घर केवळ उत्सवांपुरतेच नाही, तर कायमचेच आकर्षक व भक्कम राहू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 12:51 pm

Web Title: get your home ready for festive season important and easy tips
Next Stories
1 जाणून घ्या कसे पाठवायचे whatsapp stickers
2 Diwali 2018 Special Recipes : ‘खजूर नी पॅटीस’
3 #Dhanteras 2018: …म्हणून साजरी केली जाते धनत्रयोदशी!
Just Now!
X