भारताच्या हवाई क्षेत्रामधील आघाडीच्या जेट एअरवेज कंपनीने ‘व्हॅलेण्टाईन डे’ साजरा करण्यासाठी एक अनोखी संधी प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या संधीद्वारे ग्राहकांना आपल्या प्रिय व्यक्तीला ३५ हजार फूट उंचीवर एक अनोखी भेट देऊन आश्चर्यचकित करता येणार आहे. ‘जेट एअरलाईन’च्या विमानातील ‘जेट बुटिक’ या ‘ड्युटी फ्री’ सेवेद्वारे ग्राहकांना येथील घड्याळे, सुगंधी द्रव्ये, सौंदर्यप्रसाधने, गॅजेट्स, ट्रेंडी ज्वेलरी, प्रवासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, मद्य यापैकी कशाचीही निवड करून आपल्या प्रिय व्यक्तीला चकीत करणे शक्य होणार आहे. ‘9WPRE’ या कोडचा आधार घेऊन ग्राहकांना वरील वस्तूंवर २० टक्के मिळणार आहे.

या ऑफरखेरीज ‘जेट एअरवेज’ने ‘सिटी बॅंके’शीही हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सिटी बॅंकेच्या कार्डधारकांना या ऑफरवर आणखी १० टक्क्यांची सूट मिळणार आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नई येथून निघणाऱ्या काही निवडक फ्लाईट्सवर ग्राहकांना येत्या २१ फेब्रुवारीपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. याखेरीज प्रवाशांना भारतामधील* संबंधित फ्लाईट्समधून ‘जेट बुटिक’च्या कॅटलॉगमधून इतर वस्तूंच्या खरेदीसाठी २० टक्क्यांची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरसाठी प्रवाशांनी आगाऊ नोंदणी केल्यास त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीला एका अनोख्या पॅकमधील भेटवस्तू देऊन आश्चर्यचकीत करता येणार आहे.