नवीन वर्ष आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत साजरे करण्याइतका आनंद दुसरा कशात नसतो. घरातील प्रत्येक व्यक्तीला गिफ्ट देणे, त्याबरोबरच आपले मित्र, मैत्रीण, शिक्षक, सहकारी आणि बॉस यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देणे हे देखील तितकेच आनंददायी ठरू शकेल. जर तुम्ही कल्पकतेने या गिफ्ट्सची निवड केली तर वर्षभर तुमचे नाव विसरले जाणार नाही.

आई

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

वर्षभर तुमचे लाड पुरविणाऱ्या आईला नवीन वर्षाचे गिफ्ट देऊन तुम्ही चकित करू शकता. आईसाठी सर्वात योग्य ठरू शकते ती म्हणजे साडी. परंतु, यात काय कल्पकता असे तुम्ही म्हणाल. परंतु, जर तुम्ही दक्षिण भारत, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरातची या भागात बनवली जाणारी साडी भेट दिली तर ती तुमच्या आईला नक्कीच आवडेल.

बाबा

वडिलांसाठी नेहमीसारखे फॉर्मल किंवा ऑफिस शर्ट घेण्याऐवजी जर त्यांना तुम्ही कॉलर्सची टी-शर्ट दिले तर चालू शकेल. एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी म्हणून खादी, लिनन किंवा सिल्कचे कुर्ते दिले तरी चांगले गिफ्ट ठरू शकेल.

नातेवाईक (काका, मामा किंवा इतर पुरुष नातेवाइकांसाठी)

प्रत्येक सीजन आणि प्रत्येक प्रसंगासाठी हे गिफ्ट अतिशय योग्य ठरते. तुमचे बजेट ज्या प्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना घड्याळ भेट देऊ शकता.

सहकारी

ऑफिसच्या सहकाऱ्यांसाठी खास गिफ्ट ठरू शकते ते म्हणजे डेस्क प्लानर, डायरी, कस्टमाईज्ड पेन, टू डू लिस्ट किंवा पेन होल्डर हे गिफ्ट देऊ शकता.

भाऊ, मित्र

गॉगल्स, शूज, जॅकेट या नेहमीच्या वस्तू व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या लहान भावाला किंवा जवळच्या मित्राला मग्स, कॅलेंडर किंवा पोस्टर्स देता येतील. जर त्यांना संगीताची आवड असेल तर गिटार किंवा कसिनोदेखील भेट देता येईल.

मोठ्या भावासाठी

चांगले कपड्यांसोबत चांगली अॅक्सेसरीज असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. टाय, टाय पिन किंवा कफलिंकचा एखादा सेट तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला देऊ शकता.

शिक्षक

तुमच्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या शिक्षकांना जर तुम्ही नववर्षाची भेट दिली तर त्यांचा आनंद तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरच दिसेल. तुमच्या शिक्षकांना हा नेहमीचा अनुभव असेल की त्यांच्या पुस्तक संग्रहातील पुस्तके लोक परत आणू देत नाहीत. तेव्हा त्या गोष्टीचा नीट रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना पर्सनल लायब्ररी किट भेट देऊ शकता. यामध्ये त्यांच्या सर्व पुस्तकांच्या नोंदी ते तारखेसह करू शकतील तसेच वेळ आणि तारिख देखील नोंदवू शकतील.

बहिण, मैत्रिणींसाठी

एखादी चांगली पर्स, टॉप्स, गॉगल्स, टेडी बीअर, चॉकलेट गिफ्ट हॅम्पर इत्यादींपैकी काही एक निवडून तुम्ही जर तिला दिले तर तिला खूप आनद होईल. बांधणीची ओढणी, खादीचा कुर्ता, लॅपटॉप कव्हर, कस्टमाइज्ड मोबाइल कव्हर या देखील गोष्टी नवीन वर्षाच्या निमित्ताने देणे चांगले ठरेल.

प्रेयसी / पत्नी

बाजारात मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा तुम्ही हाताने बनवलेली एखादी वस्तू दिली तर हे नवे वर्ष तुमच्या जोडीदाराच्या नेहमी लक्षात राहील. घरी डिनर बनवून कॅंडल लाइट डिनरची आइडिया पण चांगली ठरेल. एखादी स्वीट डिश बाहेर आणणे ठीक राहील परंतु जर तुम्ही तिच्यासाठी जेवण बनवले तर तिला आवडेलच.
प्रियकर/पती

तुमच्या जोडीदाराला आवडते त्या ठिकाणी एखादी सरप्राइज ट्रीप प्लान करा. सोबत जाणे, येणे आणि चांगला वेळ घालवणे यापेक्षा अधिक छान गिफ्ट काय असू शकेल?
बॉस

केवळ तुमचा बॉस म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक किंवा मेंटोर म्हणून जर तुम्ही तुमच्या बॉसला गिफ्ट दिले तर ते नक्कीच आवडू शकेल. डुडल थॉट बुक, इअर प्लानर, लेदर किंवा मेटलचे कार्ड होल्डर, पेन होल्डर, इत्यादी गोष्टींचा तुम्ही नक्की विचार करू शकता.