News Flash

सुंठ पावडरचं सेवन केल्यास ‘या’ ६ आरोग्यविषयक तक्रारी होतील दूर!

जाणून घ्या, सुंठ खाण्याचे फायदे

चवीला तिखट असलेलं आलं चहामध्ये किंवा एखाद्या मसालेदार भाजीत घातलं की त्या पदार्थाची चव वाढते. आलं खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आल्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. यात आलेवडी,आल्याची गोळी, सुंठ पावडर, आल्याचा रस असे अनेक पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. हे सगळे पदार्थ शरीरासाठी गुणकारी आहेत. यात सुंठ पावडर ही चवीला जास्त तीक्ष्ण असते. त्यामुळे अनेक वेळा ती खाण्यास लहान मुले किंवा मोठी माणसेही टाळाटाळ करतात. परंतु, या सुंठ पावडरचे नेमके शरीरासाठी कसे फायदे आहेत ते जाणून घेऊ.
सुंठ खाण्याचे फायदे

१. भूक वाढते.

२. अॅसिडिटी दूर होते.

२. अपचन,मळमळ थांबते.

३. पोटदुखी थांबते.

४. पोटात गॅस होणे, पोट जडणे होणे

५. सुंठामुळे पित्त होत नाही. ती केवळ चवीला तिखट आहे. तसंच ती आम्लपित्तनाशक आहे.

६. खोकला, सर्दी दूर होते

दरम्यान, आलं दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. ही सुंठ मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पूड करुन घेतल्यास घरच्या घरी सुंठ पावडर करता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:04 pm

Web Title: ginger and ginger powder benefits for health ssj 93
टॅग : Health News
Next Stories
1 फॉर्च्युनरला टक्कर देणारी ‘ही’ SUV होतेय बंद, कारण…
2 Vodafone चा नवीन प्लॅन, फ्री कॉलिंगसह मिळेल दररोज 2GB डेटा
3 Samsung Galaxy M31s भारतात झाला लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Just Now!
X