22 November 2017

News Flash

असा आरोग्यदायी चहा तुम्ही कधी प्यायलात का?

यकृताबरोबरच इतर अवयवांसाठी उपयुक्त

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 10, 2017 4:28 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तम आरोग्यासाठी विशिष्ट पेय अतिशय उपयुक्त असतात. चहा, कॉफी जास्त पिऊ नये असा सल्ला अनेक जण देतात. मात्र विशिष्ट प्रकारे तयार केलेला चहा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टीबाबत आपण अनेकदा ऐकलंही असेल. त्याचा आस्वादही अनेकांनी घेतला असेलच. पण स्वयंपाकघरातील आरोग्यदायी पदार्थांपासून तयार केलेला चहा शरीरासाठी उपयुक्त असतो. आलं, हळद आणि लिंबू यांचे मिश्रण असलेला चहा यकृत आणि इतर अवयवांसाठीही चांगला असतो. यकृत हा शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असून त्याची काळजी घेणे गरजेचे असते. रक्त शुद्ध करण्याचे काम यकृताकडून केले जाते.

आलं, लिंबू आणि हळद आरोग्यासाठी उपयुक्त

आलं, लिंबू आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. या घटकांमुळे यकृत चांगले राहण्यास मदत होते. विविध आजारांपासून यकृताचे रक्षण कऱण्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरतात. लिंबामध्ये सायट्रीक अॅसिड असल्याने डिटॉक्सिकेशनसाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे यकृतासाठी घातक असलेल्या घटकांचा सहज नाश होतो. आलंही त्यासाठी उपयुक्त असते.

हा चहा कसा तयार कराल?

साहित्य – दीड कप पाणी, अर्धा चमचा हळद, १ चमचा आल्याची पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस, १ चमचा मध (चवीसाठी)

कृती – आल्याची पेस्ट, हळद आणि पाणी एकत्र करुन घ्या. ५ ते १० मिनिटे गरम करा. हे मिश्रण कपात गाळून घ्या. यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून थोडे ढवळा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

First Published on September 10, 2017 4:28 pm

Web Title: ginger lemon and turmeric tea detoxifies liver good drink for health