19 September 2020

News Flash

जिराफाचा जन्मानेही यूट्यूबवर मिळवले लाखो लाइक्स

दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात मादी जिराफाने उभ्याने केलो पिल्लाला प्रसूत

जगातील एक उंच प्राणी म्हणून जिराफाला ओळखले जाते. याच जिराफाचा जन्म होत असताना उंचीचा वरदहस्तच या प्राण्यावर असतो, हेच सिद्ध करणारा व्हिडिओ यूट्यूवबर लाखो लाइक्स मिळवत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘साबी सॅंड गेम रिझर्व्ह’ जंगलातील अशाच एका मादी जिराफाचा तिच्या पिल्लाला प्रसूत करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चिकित्सकांच्या निगराणीअभावी होणाऱ्या या उभ्या प्रसूतींमध्ये सहसा पिल्लाच्या जीवास धोका असतो, कारण त्या पिल्लाचे वजन ४५ ते ७० किलोदरम्यान असते, शिवाय उंची जवळपास सहा फूट. पंधरा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रसूत होणारे हे जिराफाचे पिल्लू जन्मताक्षणीच चालू लागतं आणि दिवस पूर्ण होताच धावू-बागडूही लागतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 7:30 pm

Web Title: giraffe birth captured on camera in the wild
Next Stories
1 एका थट्टेने बदलले त्याचे आयुष्य, दोन महिन्यात घटवले २५ किलो वजन
2 मानसिक आरोग्याचा ‘गतिमंद’ कारभार!
3 हवा प्रदूषणाने २०४०पर्यंत दररोज २५०० मृत्यू?
Just Now!
X