News Flash

गोदरेज ऍग्रोवेटची झोमॅटो आणि स्विगी सोबत हातमिळवणी

दुग्ध उत्पादने, पोल्ट्री आणि इतर आवश्यक खाद्यपदार्थांचा पुरवठा ग्राहकांना सुरळीतपणे होत राहावा यासाठी कंपनीने उचलले पुढचे पाऊल

गोदरेज ऍग्रोवेट लिमिटेड (जीएव्हीएल) या वैविध्यपूर्ण कृषी उद्योग कंपनीने झोमॅटो आणि स्विगी या फूड डिलिव्हरी ऍप्ससोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. सध्याच्या कोविड-१९ साथीच्या काळात देखील आपल्या ग्राहकांना आवश्यक खाद्यपदार्थांचा पुरवठा सुरळीतपणे होत रहावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

या भागीदारी अंतर्गत गोदरेज ऍग्रोवेटची उपकंपनी क्रीमलाईन डेअरी त्यांच्या गोदरेज जर्सी या ब्रँडमध्ये आवश्यक खाद्यपदार्थ पोहोचवणार आहे. यामध्ये दूध, तूप, दही, पनीर, ताक इत्यादींचा समावेश असेल. बिग बास्केट आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईट्सवर ही सर्व उत्पादने आधीपासून उपलब्ध असून आता हैद्राबाद, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथील ग्राहक जर्सी उत्पादनांची मागणी झोमॅटो आणि स्विगीवर देखील नोंदवू शकतात. सर्वात जवळच्या जर्सी रिटेल पॉइंट्समधून ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातील. चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे या ऍप्समार्फत डिलिव्हरी सुरु करण्यात आली आहे. तेलंगणा राज्यात झोमॅटो आणि स्विगीमार्फत फूड डिलिव्हरीवरील निर्बंध समाप्त केले गेल्यानंतर हैद्राबादमध्ये त्यांच्या सेवा सुरु केल्या जातील. या ऍप्समुळे दिवसाच्या कोणत्याही वेळी अगदी कमी वेळात ग्राहकांना ही उत्पादने मिळू शकतील.

फ्रोझन स्नॅक्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडने देखील मुंबई, कोलकाता आणि गुवाहाटीमध्ये स्विगीसोबत भागीदारी केली आहे. नगेट्स, पॅटीज, कबाब्स, टिक्काज आणि कोल्ड-कट्स अशी गोदरेज यम्मिज ब्रॅण्डची फ्रोजन स्नॅक्स उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातील. गोदरेज टायसनने मुंबईमध्ये रिअल गुड चिकन आणि गोदरेज यम्मिज या ब्रँड्स अंतर्गत उत्पादनांची डिलिव्हरी करण्यासाठी हौसिंग सोसायटी डिलिव्हरी मॉडेल देखील सुरु केले आहे. या सेवांमुळे ग्राहकांना घरी सुरक्षित राहून आपल्या प्रोटीन गरजा पूर्ण करता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 3:58 pm

Web Title: godrej agrovet ltd announced a partnership with food delivery apps zomato and swiggy nck 90
Next Stories
1 येतेय नवीन फिचर, आता ट्विटही करा Schedule
2 यंदा ‘मदर्स डे’ला द्या हे वचन; आई जाईल भारावून
3 आईचे महत्त्व सांगणारे हे विचार शेअर करुन द्या ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा!
Just Now!
X