18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

‘या’ वेळेला केलेली कृष्णाची पूजा ठरु शकते लाभदायक

यंदा तीन दिवस आल्याने संभ्रम

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 18, 2017 2:23 PM

जन्माष्टमीची पूजा कोणत्या वेळेला करायची याविषयी...

विष्णूचा आठवा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णकन्हैयाचा जन्मदिन म्हणजे देशभरातील भाविकांसाठी एक सोहळाच असतो. कृष्णाचा जन्म भाद्रपदातील आठव्या दिवशी झाला असे मानले जाते. यावर्षी १४ आणि १५ ऑगस्ट अशा दोन दिवशी गोकुळाष्टमी आल्याने हा सण नेमका कधी साजरा करायचा? कोणत्या वेळी केलेली पूजा सर्वात लाभदायक ठरेल? असा प्रश्न कृष्ण भक्तांना साहजिकच पडला असेल तर पूजेची चांगली वेळ आणि पद्धती आपण जाणून घेऊया…

१४ ऑगस्टला संध्याकाळी ७.४६ मिनिटांनी मुहूर्त सुरु होणार असून १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४० मिनिटांपर्यंत केलेली पूजा लाभदायक ठरु शकते. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळनंतर नवमी सुरु होणार आहे. कृष्णाच्या जन्माच्या दिवशी अष्टमी आणि रोहीणी नक्षत्र होते. मात्र हे दोन्ही यावेळी ३ वेगवेगळ्या दिवशी आले आहे. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी अष्टमी तर १५ आणि १६ रोजी रोहीणी नक्षत्र आले आहे. १५ ऑगस्टच्या रात्री २.३२ मिनिटांनी रोहीणी नक्षत्र सुरु होणार असून १६ ऑगस्ट रोजी रात्री १२.५० या वेळेला ते संपणार आहे.

खरं तर कोणत्याही देवाचे पूजन करायला मनातील भाव महत्त्वाचा असतो. मात्र हिंदू पंचांगानुसार तुम्हाला जन्माष्टमीची पूजा करायची असेल तर १५ ऑगस्ट रोजी ही पूजा केलेली चांगली. त्यामुळे १५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता कृष्णजन्माची पूजा तुम्ही करु शकता. यावेळी नवमी लागलेली असली तरीही उदया नक्षत्र आहे. शास्त्रामध्ये उदया नक्षत्राला विशेष महत्त्व असल्याने यावेळी केलेली पुजा जास्त लाभदायक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तुम्हाला जन्माष्टमीचा उपवास करायचा असेल तर तोही तुम्ही १५ ऑगस्ट रोजी केल्यास फायद्याचा ठरु शकतो.

First Published on August 13, 2017 11:11 am

Web Title: gokulashtami 2017 celebration mumbai maharashtra good time for krishna pooja