मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि ईटीएफमधील आवकमुळे २०१९ च्या पहिल्या सहामाहीत सोन्याची मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहचली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार २०१९च्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक स्तरावर सोन्याची मागणी वाढली आहे. दुसऱ्या तिमाहितील वाढ १,१२३ टन झाली असून गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ही वाढ ८ टक्के इतकी आहे.

मध्यवर्ती बँकेकडून सातत्याने होणारी खरेदी आणि सोने आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये (ईटीएफ) सातत्याने होणारी वाढ हे मागणीतील या वाढीमागील दोन मुख्य घटक आहेत. या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचा विचार करता सन २०१९च्या पहिल्या सहामाहीत सोन्याची मागणी २,१८१.७ टनापर्यंत वाढली असून गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत ही वाढ ८ टक्के इतकी आहे.

मध्यवर्ती बँकांनी २०१९च्या दुसऱ्या तिमाहीत २२४.४ टन सोनेखरेदी केली. यामुळे पहिल्या सहामाहीतील सोनेखरेदी ३७४ टनापर्यंत पोहोचली असून आमच्या डेटा सेरीजमधील सोन्याच्या जागतिक संचयातील सहामाहीतील ही सर्वाधिक ठोक वाढ आहे. सध्याच्या प्रवाहाला अनुसरून सोन्याची खरेदी ही प्रामुख्याने उदयोन्मुख बाजारपेठांचा समावेश असलेल्या विविध देशांमध्ये दिसून येते.

दुसऱ्या तिमाहीत सोनेआधारित ईटीएफ धारणेत ६७.२ टनांनी वाढ होऊन सहा वर्षांच्या २,५४८ टन या सर्वोच्च पातळीवर ती पोहोचली. भूराजकीय अस्थैर्य, मध्यवर्ती बँकांकडून पतधोरणासंदर्भात बचावात्मक पवित्रा आणि जून महिन्यात सोन्याच्या किमतीत झालेली वाढ यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर निधीची आवक झाली.

भारतीय दागिने क्षेत्रात झालेल्या सुधारणेमुळे दुसऱ्या तिमाहीत मागणी १२ टक्क्यांनी वाढून १६८.८ टनावर पोहोचली. जूनमध्ये चढ्य़ा किमतींमुळे मागणी गोठण्यापूर्वी लग्नाचा मौसम आणि उत्सवी काळातील विक्रीमुळे जोरदार मागणी होती. भारतातील मागणीच्या वृद्धीमुळे जागतिक दागिने क्षेत्रातील मागणी गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढून ५३१.७ टन इतकी झाली. पहिल्या तिमाहीतील सौम्य मागणीसह पहिल्या सहामाहीत ४७६.९ टन इतकी सहा वर्षांची निचांकी मागणी नोंदली गेली. चीनमधील मागणीत झालेली २९ टक्के घट ही प्रामुख्याने दुसऱ्या तिमाहीतील जागतिक पातळीवरील मागणीत घट होण्यामागे कारणीभूत होती.