News Flash

रोज ‘Good Morning’ मेसेज पाठवताय? मग हे वाचाच

तुमच्या स्मार्टफोनवर याचा परिणाम होऊ शकतो

आपल्यापैकी अनेकांना रोज ‘Good Morning’ मेसेज पाठवण्याची सवय असते. भले समोरचा व्यक्ती तुम्हाला उत्तर देत नसेल. तुमच्या रोजच्या रोज मेसेज पाठण्याच्या सवयीमुळे एखादा व्यक्ती खूपच त्रासला असेल तरीही आपली ‘Good Morning’ मेसेज पाठवण्याची सवय काही जात नाही. एखादा ‘Good Morning’ मेसेज पाठवला तर काय फरक पडतोय असं तुम्हाला वाटत असेल तर मग ही बातमी जरूर वाचा कारण या सवयीमुळे तुमच्या स्मार्टफोनवर याचा परिणाम होऊ शकतो. आता तो कसा काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधली स्पेस कमी होऊ शकते असं समोर आलं आहे.

स्वस्त: स्मार्टफोन आणि त्याहून स्वस्त: डाटा प्लानमुळे भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे, नव्यानं फेसबुक, व्हॉट्स अॅप वापरणारा भारतातील हा वर्ग मोठ्या प्रमाणात Good Morning’ मेसेज ग्रुपवर पाठवतो किंवा शेअर करतो यामुळे दर ३ पैकी एका स्मार्टफोनधारकांच्या फोनमधली स्पेस कमी होते असं या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात गुगलवरून Good Morning’ मेसेज असणारे फोटो डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या दहा पटींनी वाढली आहे. यामुळे गुगलवर याचा प्रमाणापेक्षा जास्त ताण येऊ लागला आहे हे नुकतच गुगलनंदेखील मान्य केलं आहे. फुलं, सूर्य, लहान मुलं याच्या छायाचित्रांवर असलेले शुभेच्छांचे मेसेज डाऊनलोड करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत भारतीयांच्या स्मार्टफोनची स्पेस लवकर घटत आहे असं वेस्टर्न डिजिटल फंडनं दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्याही स्मार्टफोनची स्पेस लवकर का संपत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे एक उत्तर असू शकतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:00 pm

Web Title: good morning messages is leading smartphone users in india run out of space
Next Stories
1 भारतात फेसबुक काही काळ बंद
2 वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ एकत्र खा
3 प्रजासत्ताक दिनानिमित्तानं जिओनं आणली भन्नाट ऑफर!
Just Now!
X