स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयने आपल्या ग्राहकांना लॉकडानमध्ये दिलासादायक बातमी दिली आहे. एसबीआयच्या एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत ट्रान्सजेक्शनसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. विशेष म्हणजे, एसबीआय व्यतीरिक्त इतर एटीएम ट्रान्सजेक्शनवरही कोणतेही शुल्क लागणार नाही. एसबीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

२४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांना पाहून एसबीआयनं हा निर्णय घेतला आहे. एसबीआयनं एटीएम आणि इतर बँकेच्या एटीएममधून केलेली देवाण-घेवाण मोफत करण्याचा निर्णय़ घेतला आहे. १५ एप्रिलपासून ही सुविधा लाहू करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसबीआयचे ग्राहक ३० जूनपर्यंत कितीही ट्रान्सजेक्शन करू शकतात.

करोना व्हायसचा प्रादुर्भाव देशात दिवसागणिक वाढतच आहे. दररोज करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. देशात ४०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे तर १२००० पेक्षा जास्त करोनाबाधित झाले आहेत.