आता सुट्या संपत आल्या असल्या तरीही काही दिवसांतच दिवाळी आणि पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुटीतील ट्रीपच्या चर्चा सुरु होतील. त्यातही परदेशातली ट्रीप प्लॅन करायची असल्यास त्यासाठी थोडे आधीच प्लॅनिंग लागते. आता परदेशवारी म्हटल्यावर त्यासाठी खूप मोठा खर्च होणार हे ओघानेच आले. पण कमीत कमी खर्चात तुम्हाला परदेशवारी करायची असेल तर तुम्ही युरोपचा नक्कीच विचार करु शकता. युरोपची संस्कृती, इतिहास, कला समजून घेणे महत्त्वाचे आहे. याठिकाणी गेल्यास अजिबात चुकवू नयेत अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यातील काही ठिकाणांची माहिती करुन घेऊया…

बिझारे टुरिस्ट स्पॉट 

तुम्ही स्मारके आणि चर्च पाहून कंटाळला असाल तर युरोपमधील काही टुरिस्ट स्पॉट तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करतील. हे ठिकाण म्हणजे प्रेमाचे, शांतीचे आणि आशेचे प्रतिक आहे. याशिवाय याठिकाणी असणारे वेगळ्या प्रकारचे रस्तेही पाहण्यासरखे आहेत. याठिकाणचे डोंगर, बोगदे, संग्रहायलयेही पाहण्यासारखी आहेत. बेढापेस्ट याठिकाणी असणारे मास स्टीमबाथचा अनुभव हा नक्कीच खास असेल यात शंका नाही.

नाईटलाईफ

युरोपचा पूर्वेकडील भाग हा लाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांसाठी हे पार्टी डेस्टीनेशन म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे पूल आणि इमारतींसाठी पूर्व युरोप ओळखला जातो. टॅलिन, प्राग, बोस्निया आणि कोटर याठिकाणी अतिशय कल्पक असे पार्टीचे सिन तुम्हाला पहायला मिळतील. अतिशय स्वस्तातील मद्यपान, छान कपडे घातलेले लोक आणि छान असे संगीत यामध्ये तुम्ही पार्टीचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकाल.

दृष्टीकोन विस्तारायला नक्की मदत होईल

याठिकाणी असणारी शिल्पकला आणि चित्रकला पाहून तुम्हाला नक्कीच आपल्या कलेच्या ज्ञानात भर पडल्याचे वाटेल. तसेच याठिकाणी असलेल्या प्रगतीशील कृती आणि आकर्षक तंत्रज्ञान यांमुळे तुमच्या ऐतिहासिक दृष्टीकोनात भर पडेल.

कमी खर्चात पाहता येणारी ठिकाणे 

पूर्वेकडचा युरोप हा पश्चिमेकडील स्वित्झरलॅंड, ब्रिटेन आणि बाल्टीक देशांपेक्षा नक्कीच स्वस्त आहे. या सगळ्या देशांच्या चलनामध्ये फरक असला तरीही पूर्वेकडे सगळ्या गोष्टी जवळपास ३० टक्क्याने स्वस्त आहेत. तसेच याठिकाणी अनेक किल्ल्यांवर मोफत प्रवेश आहे. तसेच येथील हॉटेलमध्ये पारंपरिक पदार्थ अतिशय कमी किंमतीत मिळतात. तसेच येथील स्थानिक वाईन अतिशय कमी किंमतीत मिळते.

चित्रपटांच्या चित्रिकरणाची उत्तम लोकेशन 

हॉलिवूड ब्लॉकबस्टर आणि डिस्नेच्या चित्रपटांचे चित्रिकरण होत असलेल्या अनेक आकर्षक जागा याठिकाणी तुम्हाला पहायला मिळतात. जंगल, डोंगर, विलोभनीय निसर्गसौंदर्य असलेली ठिकाणे याठिकाणी विकसित करण्यात आली आहेत. चित्रिकरणासाठी वापरली जाणारी ही ठिकाणे नक्कीच पाहण्यासारखी आहेत.