21 November 2017

News Flash

एकाकीपणामुळे मुले झोप न मिळाल्याने त्रस्त

दोन हजार २३२ मुलांची माहिती गोळा केली

पीटीआय, लंडन | Updated: May 18, 2017 1:29 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जी किशोरवयीन मुले एकाकी आयुष्य जगतात, त्यांना अत्यंत कमी दर्जाची अर्थात कमी कमी झोप मिळत असल्याचे एका ब्रिटिश अभ्यासात समोर आले आहे. जी मुले एकाकी होती, त्यांना झोप कमी न मिळाल्याने त्यांना इतरांच्या तुलनेत थकवा (थकल्यासारखे वाटणे )येण्याचे प्रमाण २४ टक्क्यांनी अधिक होते. तसेच दिवसभरात काम करताना त्यांना लक्ष केंद्रित करताना अडचणी निर्माण होत असल्याचे अभ्यासात आढळून आले.

ब्रिटनच्या किंग्स महाविद्यालयातील १८ ते १९ वर्षांदरम्यानच्या दोन हजार २३२ किशोरवयीन मुलांची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

त्यासाठी या मुलांच्या मागील काही महिन्यात घेतलेल्या झोपेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये झोप येणे, झोपण्याची वेळ, झोपेमध्ये आलेले अडथळे तसेच झोप न मिळाल्याने त्याचा दिवसभरात अभ्यास करताना आलेल्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला. यामधील २५ ते ३० टक्के मुलांना  कधी कधी एकाकी वाटते. तर यातील पाच टक्क्यांपेक्षा अधिक मुलांना वारंवार एकाकीपणाची भावना निर्माण होत असल्याचे सांगितले.

कमी झोप घेणे आणि एकाकी वाटणे यांचा परस्पर संबंध असल्याचे संशोधकांना या वेळी आढळले. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. झोप न मिळाल्याने आणि एकाकीपणा वाटल्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते. एकाकीपणामुळे मनामध्ये नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. झोप कमी लागण्यासह अनेक आजार यामुळे उद्भवतात. एकाकीपणा घालवण्यासाठी सर्वासोबत मिसळणे अधिक फायदेशीर असल्याचे किंग्स महाविद्यालयाचे प्राध्यापक लुईस आर्सेनॉल्ट यांनी म्हटले आहे. हे संशोधन मानसिक स्वास्थ्यासंबंधी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

First Published on May 18, 2017 1:29 am

Web Title: good sleep is important for health