गुगलचे अ‍ॅप्स म्हणजे धोकादायक व्हायरस किंवा बग सोडण्यासाठी हॅकर्सचं आवडतं ठिकाण आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे लोकप्रिय Google Assistant मध्ये एक ‘बग’ आल्याची माहिती समोर आली आहे. जगभरातील अनेक अँड्रॉइड युजर्सनी गुगल असिस्टंटमध्ये आलेल्या बगबाबत तक्रार केली आहे.

वापर करण्यासाठी गुगल असिस्टंट ओपन करुन ‘Hey Google’ किंवा ‘Ok, Google’ बोलताच फोनची स्क्रीन फ्रीज होते व सतत ऑन राहत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. युजरने कितीही प्रयत्न करुनही स्क्रीन ऑफ होत नाही किंवा फोन देखील लॉक होत नाही. याद्वारे फोनची बॅटरी लवकर ड्रेन(बॅटरी संपणे) होते. यामुळे फोनचा डिस्प्ले कायमस्वरुपी खराब होण्याची शक्यताही वाढते.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

या ‘बग’बाबत सप्टेंबर महिन्यातच काही युजर्सनी गुगल सपोर्ट फोरममध्ये तक्रार केली होती. या ‘बग’चा सर्वाधिक परिणाम सध्या गुगल पिक्सल स्मार्टफोन्स आणि गुगल होम डिवाइसव्हर होतोय. गुगलकडूनही अद्याप या बगबाबत काही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा ‘बग’ केव्हापर्यंत फिक्स होणार याबाबत नेमकं सांगता येणं सध्यातरी कठीण आहे.

आणखी वाचा : ‘या’ खास फीचरमुळे भारतात लाँच होणार नाही Google Pixel 4

काय होतं या ‘बग’मुळे :-
या ‘बग’मुळे गुगल असिस्टंटशी कनेक्टेड असलेल्या स्मार्ट उपकरणांचा वापर करणाऱ्या अनेक युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ‘बग’मुळे फोनच्या बॅटरीला मोठा धोका असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे फोन नेहमी सुरू राहतो आणि लॉक देखील करता येत नाही. ‘हे गुगल’ बोलताच फोनची स्क्रीन फ्रीज होते. परिणामी युजर्सना अन्य कोणत्याच अ‍ॅपचा वापर करता येत नाही.