गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन ३० लोकप्रिय अ‍ॅप्स डिलीट केले आहेत. यापैकी अनेक अ‍ॅप्स हे फोटोंवर फिल्टर लावणारे अ‍ॅप्स आहेत. गुगलने एका मालवेअरचा धोका लक्षात घेता हे अ‍ॅप्स आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही अ‍ॅप्स गुगल प्लेवरुन डाउनलोड करता येणार नाहीत. मात्र धक्कादायक बाब ही आहे की ही अ‍ॅप्स आतापर्यंत दोन कोटींहून अधिक जणांनी डाऊनलोड केली आहेत.

मालवेअरचा धोका असणारी ३० हून अधिक अ‍ॅप्स होते. त्यापैकी थर्ड पार्टी सेल्फी अ‍ॅप्स सर्वात धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर हे अ‍ॅप्स हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोबाइल सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या व्हाइट ऑप्सने (WhiteOps) दिलेल्या माहितीनुसार हे अ‍ॅप्स युझर्सच्या माहिती चोरण्याचे काम करतात. तसेच या अ‍ॅप्सवर कुठेही क्लिक केलं नाही तरी जाहिराती आणि वेगवेगळ्या वेबसाईट ओपन होतात. हे अ‍ॅप्स डिलीट केले नाही तर जाहिराती दाखवण्याबरोबरच युझर्सचा डेटाही चोरीला जाण्याची शक्यता आहे.

नक्की पाहा  >> ‘ही’ आहेत कोट्यवधी भारतीयांनी डाऊनलोड केलेली टॉप दहा Made In China Apps

व्हाइट ऑप्सने या ३० अ‍ॅप्सची यादी जारी केली आहे जे गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत. तुम्हीही ही अ‍ॅप्स डाउनलोड केली असतील तर ती त्वरित डिलीट करा. चला जर पाहुयात या अ‍ॅप्सची यादी आणि किती जणांनी ते डाउनलोड केलं आहे…

अ‍ॅप्स नाव  आणि डाउनलोड केलेल्या युझर्सची संख्या)
१) Yoriko Camera- १ लाख डाउनलोड

२) Solu Camera- ५ लाख

३) Lite Beauty Camera- १० लाख

४) Beauty Collage Lite- ५ लाख

५) Beauty and Filters camera- १० लाख

६) Photo Collage and beauty camera- एक लाख

७) Gaty Beauty Camera- ५ लाख

८) Pand Selife Beauty Camera – ५० हजार

९) Cartoon Photo Editor and Selfie Beauty Camera- १० लाख

१०) Benbu Seilfe Beauty Camera- १० लाख

११) Pinut Selife Beauty and Photo Editor – १० लाख

१२) Mood Photo Editor and Selife Beauty Camera  – ५ लाख

१३) Rose Photo Editor and Selfie Beauty Camera- १० लाख

१४) Selife Beauty Camera and Photo Editor- १ लाख

१५) Fog Selife Beauty Camera- १ लाख

१६) First Selife Beauty Camera and Photo Editor- ५० लाख

१७) Vanu Selife Beauty Camera       – १ लाख

१८) Sun Pro Beauty Camera- १० लाख

१९) Funny Sweet Beauty Camera-  ५ लाख

२०) Little Bee Beauty Camera- १० लाख

२१) Beauty Camera and Photo Editor Pro- १० लाख

२२) Grass Beauty Camera- १० लाख

२३) Ele Beauty Camera- १० लाख

२४) Flower Beauty Camera – १ लाख

२५) Best Selfie Beauty Camera- १० लाख

२६) Orange Camera- ५ लाख

२७) Sunny Beauty Camera – १० लाख

२८) Pro Selfie Beauty Camera – ५ लाख

२९) Selfie Beauty Camera Pro – १० लाख

३०) Elegant Beauty Cam-2019 – ५० हज़ार

व्हाइट ऑप्सने दिलेल्या माहितीनुसार युझर्सने एकदा हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर ते पुन्हा डिलीट करता येत नसल्याच्या तक्रारी केल्याचेही म्हटलं आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार हे अ‍ॅप्स युझर्सला मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखवण्याच्या हेतूनेच तयार करण्यात आले आहेत.