30 September 2020

News Flash

Google Duo मध्ये आता एकाचवेळी 32 जणांना करा व्हिडिओ कॉल

Google Duo मध्ये व्हिडिओ कॉलिंग युजरचं लिमिट वाढलं

करोना व्हायरसमुळे बहुतांश लोकं घरातच असल्याने व्हिडिओ कॉलिंगचं प्रमाण वाढलंय. हे लक्षात घेऊन गुगलने आपलं व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप Google Duo मध्ये व्हिडिओ कॉलिंग युजरचं लिमिट वाढवलं आहे. आता वेब ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये 32 सदस्यांना सहभागी होता येणार आहे.

Google Duo मध्ये सुरूवातीला केवळ 8 जणांना व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होता येत होतं. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये ही मर्यादा वाढवून 12 करण्यात आली होती, आणि आता पुन्हा एकदा कंपनीने या मर्यादेत वाढ केल्यामुळे वेब ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये 32 सदस्यांना सहभागी होता येईल. Google Chrome च्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये हे फीचर वापरता येईल. यासाठी युजर्सना Duo च्या वेब व्हर्जनमध्ये लॉग-इन करावं लागेल. लॉग-इन करण्यासाठी गुगल अकाउंटचा वापर करणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला फोन नंबरची गरज लागत नाही.

Google Duo व्यतिरिक्त कंपनीने Google Meet हे अ‍ॅप देखील सर्वांसाठी मोफत उपलब्ध केलं आहे. सुरूवातीला गुगलने Meet अ‍ॅप फक्त प्रोफेशनल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लाँच केलं होतं. पण, लॉकडाउनमध्ये व्हिडिओ कॉलिंगचं प्रमाण वाढल्यानंतर Meet अ‍ॅपही कंपनीने सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2020 2:59 pm

Web Title: google duos web group video call limit increased to 32 participants get details sas 89
Next Stories
1 Airtel ची खास ब्रॉडबँड सेवा, ‘या’ २५ शहरांमध्ये प्री-बुकिंगला सुरूवात
2 महाग झाले ‘रेडमी’चे दोन स्मार्टफोन, कंपनीने वाढवली किंमत
3 चिनी वस्तूंबाबत ई-कॉमर्स कंपन्यांकडे परेश रावल यांनी केली ‘ही’ मागणी, सोशल मीडियावर होतंय कौतुक
Just Now!
X