08 August 2020

News Flash

TikTok ला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न, ‘हे’ लोकप्रिय अ‍ॅप खरेदी करण्याची तयारी

टिकटॉक या व्हिडिओ शेअरींग अ‍ॅपची वाढती लोकप्रियता अनेक मोठ्या कंपन्यांसाठी डोकेदुखी

टिकटॉक या व्हिडिओ शेअरींग अ‍ॅपची वाढती लोकप्रियता अनेक मोठ्या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिणामी आता फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी, गुगल नवं अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे.

टिकटॉक आणि फायरवर्क दोन्ही अ‍ॅप्लीकेशनमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. पण, फायरवर्कमध्ये थोडेफार फीचर्स वेगळे आहेत. टिकटॉकमध्ये युजर्स १५ सेकंदांचा व्हिडिओ बनवू शकतात, तर फायरवर्कमध्ये युजर्स ३० सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो. तसंच यामध्ये उभा-आडवा अशा दोन्ही प्रकारे यामध्ये व्हिडिओ शूट करता येतो.

गुगलशिवाय चीनची मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo देखील फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत. पण , फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांपेक्षा पुढे आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच फायरवर्कने भारतात एन्ट्री केली आहे. तसंच, फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला १०० मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे.

आणखी वाचा- अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची ‘छप्परफाड’ कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ हजार कोटींची उलाढाल

शॉर्ट व्हिडिओ मेकिंगची वाढलेल्या लोकप्रियतेमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फेसबुकनेही lasso नावाचं एक अ‍ॅप लाँच केलं आहे. फेसबुकचं हे अ‍ॅप सध्यातरी केवळ अमेरिकेतच उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 11:09 am

Web Title: google eyes social video app firework to to take on tiktok sas 89
Next Stories
1 वाढदिवशी झहीर खानला ट्रोल करणाऱ्या पांड्याची नेटकऱ्यांकडून खरडपट्टी
2 अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची ‘छप्परफाड’ कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ हजार कोटींची उलाढाल
3 ‘सॅमसंग’चा घडी घालता येणारा Galaxy Fold खरेदी करण्याची संधी
Just Now!
X