04 March 2021

News Flash

#GoogleForIndia 2018 : मराठीच्या तालावर नाचणार तुमचा फोन, आता गुगल असिस्टंट मराठीत

गुगल असिस्टंटची सेवा आता हिंदी आणि इंग्रजीबरोबरच मराठीतही

यापुढे गुगल असिस्टंटला सूचना देण्यासाठी तुम्हाला केवळ इंग्रजी किवा हिंदीमध्ये बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही मायबोली मराठी भाषेत बोलुनही गुगल असिस्टंटला सूचना देऊ शकतात. Google for India 2018 (गुगल फॉर इंडिया) चं चौथं एडिशन आज दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गुगलने भविष्यातील योजनांबाबत अनेक घोषणा केल्या. यावेळी गुगलचे सिनीयर इंजिनिअरिंग डायरेक्टर प्रवीर गुप्ता यांनी गुगल असिस्टंटची सेवा आता मराठी भाषेतही सुरू होत असल्याची घोषणा केली.

गुगल असिस्टंटची सेवा आता हिंदी आणि इंग्रजीबरोबरच प्रादेशिक भाषांमध्येही सुरू होणार आहे. यामध्ये सध्या मराठी भाषेत सेवा उपलब्ध होणार असून लवकरच इतर सात भारतीय भाषांमध्येही ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, असं गुप्ता यांनी सांगितलं. त्यामुळे आता गुगल असिस्टंटसोबत तुम्ही मायबोली मराठी भाषेत बोलुनही सूचना देऊ शकतात. म्हणजे तुम्हाला एखादं गाणं ऐकायचं असेल तर गुगल व्हॉइस असिस्टंट ओपन करुन तुम्हाला Play My Favourite song असं इंग्रजीत म्हणण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही ‘माझं आवडतं गाणं सुरू कर’ एवढंच म्हटलं की लगेच गुगल आपलं काम करेल.

याशिवाय, आता गुगल असिस्टंवर तुम्हाला ट्रेनचं लोकेशनही समजू शकणार आहे. Where’s My Train : या अॅपसोबत गुगल असिस्टंटने भागीदारी केली आहे त्यामुळे प्रश्न विचारताच ट्रेनच्या जागेची माहिती तुम्हाला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 2:45 pm

Web Title: google for india 2018 google assistant will be available in marathi
Next Stories
1 दारू पिऊन गाडी चालवाल तर खबरदार, तरूणीने लावला भन्नाट शोध
2 ३६२ किलो लिंबं चोरणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
3 १९७० मधील पहिल्या अॅपल कॉम्प्युटरचा लिलाव, किंमत वाचून व्हाल थक्क
Just Now!
X