भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री १२ वाजून १० मिनिटांनी गुगल आपली नवी ऑपरेटिंग सिस्टीम ‘अँड्रॉईड ओ’ लाँच करणार आहे. या सिस्टीमची वाट पाहणाऱ्यांची प्रतीक्षा आता या घोषणेमुळे संपली आहे. न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी अँडड्रॉईड ओ लाँच ही सिस्टीम गुगलतर्फे लाँच केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही Android.com या वेबसाईटवर पाहू शकणार आहात.

‘ओरियो’ या हे या सिस्टीमचे नाव असणार?
गुगलची नवी ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉईड ओ चे नाव ‘ओरियो’ असण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिस्टीमचे नाव ओरियो असू शकते. या सिस्टीमचे नेमके नाव काय असेल हे अद्याप गुगलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. अँड्रॉईड N चे नाव न्यूटेला असेल असे मागील वर्षी वाटले होते मात्र गुगलने या सिस्टीमचे नाव नूगा असे ठेवले त्याच प्रमाणे आता अँड्रॉईड O चे नाव काय असेल याचे फक्त अंदाजच वर्तवले जात आहेत.

काय असतील फिचर्स?
अँड्रॉईड ओ या सिस्टीममध्ये ‘पिक्चर-इन-पिक्चर मोड’ आणि नोटिफिकेशन डॉट असे नवे फिचर्स असणार आहेत. पिक्चर इन पिक्चर मोड द्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार आहे. नवे इमोजीही उपलब्ध होणार आहेत. तसेच या मोडमध्ये दोन युझर्स एकाचवेळी एक अॅप वापरू शकणार आहेत.

नोटिफिकेशन डॉटच्या सुविधेमुळे अॅपच्या आयकॉनवर टॅप केल्यानंतर लगेचच नोटिफिकेशनची झलक पाहता येणार आहे. चांगलं बॅटरी लाईफ, उत्कृष्ट नोटिफिकेशन सिस्टीम, वायरलेस ऑडिओ फिचर्स हे देखील अँड्रॉईड ओ मध्ये असणार आहेत अशीही माहिती समोर येते आहे.