गुगलने आपल्या युजर्सना झटका देताना लोकप्रिय क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग अ‍ॅप हँगआउटमधून (Google Hangouts ) ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फिचर हटवलं आहे. त्यामुळे आता युजर्स Google Hangouts द्वारे ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करु शकणार नाहीत.

Google Hangouts ऐवजी कंपनी आपल्या हँगआउट युजर्सना दुसरं व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप Google Meet वर री-डायरेक्ट करत आहे. गुगलने 2013 मध्ये Hangouts हे क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग अ‍ॅप लाँच केलं होतं. गुगल आता हँगआउटला गूगल मीट (Google Meet) ने रिप्लेस करण्याच्या तयारीत आहे.

आणखी वाचा – (भारतीयांसाठी गुगलकडून गुड न्यूज, Google Pay बाबतचं ‘ते’ वृत्त फेटाळलं) 

गुगल हँगआउट अ‍ॅपचं 36.0.340725045 व्हर्जन ओपन करताच युजर्सना “Video calls in Hangouts now use Google Meet. That gives you live captions, screen sharing, and more” असा संदेश दिसत आहे. ज्या युजर्सनी अद्याप आपलं अ‍ॅप अपडेट केलेलं नाही ते मात्र अजूनही ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फिचरचा वापर करु शकतात.