News Flash

आता फाइल शेअरिंगसाठी App ची गरज नाही, गुगलचं नवीन Nearby Share फीचर

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये मिळेल नवीन पर्याय...

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गुगलने अँड्रॉइड फोन्ससाठी Nearby Share फीचरची अधिकृत घोषणा केली आहे. अँड्रॉइड  6.0  किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनसाठी कंपनीने हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला हे फीचर काही गुगल पिक्सेल आणि सॅमसंगच्या डिव्हाइसेसवर उपलब्ध होईल. नंतर काही दिवसांमध्ये सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआउट केलं जाईल. याद्वारे मोठ्या साइजच्या फाइल्सही काही सेकंदांमध्ये दुसऱ्या फोनमध्ये ट्रांसफर करता येणं शक्य होणार आहे.

गुगलचं हे फीचर अ‍ॅपलच्या AirDrop फीचरप्रमाणे काम करतं. याद्वारे अँड्राइड युजर्स एका डिव्हाइसमधून अन्य डिव्हाइसमध्ये जलदगतीने फाइल्स पाठवू शकतील. हे एक इनबिल्ट फीचर आहे. त्यामुळे कोणतं अ‍ॅप डाउनलोड करावं लागत नाही. याद्वारे फाइल्स, फोटो, व्हिडिओ, आणि लिंक्स शेअर करता येतात.  अँड्रॉइड  6.0 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनच्या सर्व अँड्रॉइड पोनवर हे डिव्हाइस काम करेल. प्रायव्हसी सुरक्षेसाठी सेंडर आणि रिसिव्हरची माहिती पूर्णपणे एनक्रिप्टेड असेल. तुमचा डिव्हाइस इतरांना व्हिजिबल असावा की नाही याचा पर्यायही यामध्ये आहे.

स्मार्टफोन्समध्ये मोठ्या साइजच्या फाइल्स शेअर करण्यासाठी अनेक युजर्स आतापर्यंत ShareIt किंवा Xender या अ‍ॅप्सचा वापर करत होते. पण नुकतेच भारताने ५९ चिनी अ‍ॅप्स बॅने केले, त्यामध्ये ShareIt आणि Xender चाही समावेश आहे. त्यामुळे युजर्स सध्या अशा फाइल्स ट्रांसफर करण्यासाठी दुसऱ्या अ‍ॅपच्या शोधात आहेत. अशा युजर्सना आता गुगलच्या  Nearby Share फीचरमुळे दिलासा मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 9:28 am

Web Title: google is rolling out nearby share file sharing feature like airdrop android rolling out sas 89
Next Stories
1 Amazon Prime Day Sale : सॅमसंगपासून अ‍ॅपलपर्यंत, अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट
2 पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार ठेवा दूर; अशी घ्या काळजी
3 शरीरावर खाज सुटल्यामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय नक्की करा
Just Now!
X