हल्ली कोणतीही गोष्ट हवी असेल तर दुकानात वगैरे जाऊन ती खरेदी करण्याचे दिवस काही दिवसांनी इतिहासात जमा होतील. जग स्मार्ट होत चाललंय आणि आपली कामं झटपट करण्यासाठी लोकांच्या उपयोगी येतात ती  वेगवेगळी  स्मार्ट अॅप्लिकेशन. फक्त मेसेज करणे किंवा मनोरंजन करणं एवढंच काम काही अॅपचं राहिलं नाही तर यापलिकडची भूमिका हे अॅप बजावत आहेत. म्हणजे बील भरण्यापासून ते डॉक्टरच्या अपाँइंटमेंट बुक करण्यापर्यंत याचे अनेक फायदे आहेत पण अनेकदा होतं असं की यासाठी वेगवेगळे अॅप डाऊनलोड करावे लागतात. आणि हिच समस्या ओळखून गुगलने नवे Areo अॅप लाँच केले आहे.

हे अॅप एकच असले तरी याचे फायदे मात्र अनेक आहेत बरं का! म्हणजे तुम्ही या अॅपच्या माध्यमातून जेवण मागवू शकता, पार्लरची अपाँईट घेऊ शकता, घरातले छोटे मोठी काम करण्यासाठी प्लम्बर किंवा कारपेंटर यांना देखील घरी बोलावू शकता. म्हणजे एका अॅपचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी करु शकता. गुगल मॅपच्या साह्याने तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या सेवांची माहिती एका क्लिकवर मिळू शकते. म्हणजे तुमची वेगवेगळी काम करण्यासाठी तुम्हाला ढीगभर अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. सध्या तरी मुंबई आणि बंगळूरूमध्येच ही सेवा देण्यात आली आहे.