News Flash

Google Maps ची सेवा आता मराठीत, भारतीय युजर्ससाठी कंपनीने केला मोठा बदल

आता मराठीत वापरा Google Maps ची सेवा

भारतात नेव्हिगेशनसाठी (Navigation) बहुतांश युजर्स गुगल मॅपचा (Google Maps) वापर करतात. पण ही सेवा इंग्रजीत असल्याने इंग्रजी न समजणाऱ्या युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत होता. पण, आता कंपनीने युजर्सच्या आवश्यकतेनुसार यामध्ये काही बदल करण्याची घोषणा केली आहे. यानुसार आता ही सेवा मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे.

जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, त्यामुळे भारतीय नेटकऱ्यांच्या गरजांकडेही विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळे गुगलनेही भारतीय युजर्सच्या गरजा आणि त्यांच्या समस्या लक्षात घेऊन गुगल मॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

कंपनीने गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन (Automatic Transliteration) सिस्टिम सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅपची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युजर्सना एखादा पत्ता वगैरे शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

एका ब्लॉग पोस्टद्वारे गुगलने 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. गुगल मॅपची सेवा आता मराठीसोबतच हिंदी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही वापरता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 2:05 pm

Web Title: google maps will auto translate places in 10 regional languages including marathi google maps marathi sas 89
Next Stories
1 ‘ताजमहाल’च्या धर्तीवर Microsoft चं अलिशान ऑफिस, कंपनीने नोएडात सुरू केलं ‘इंडिया डेव्हलपमेंट सेंटर’
2 Vodafone Idea ग्राहकांना मिळतोय 50GB बोनस डेटा, जाणून घ्या डिटेल्स
3 Reliance Jio चा शानदार प्लॅन, मिळेल 168GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Just Now!
X