Google Pixel 2 XL च्या किंमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. भारतामध्ये पिक्सेल 2 एक्सएल (६४जीबी) चा फोन ४५, ४९९ रूपयांना मिळणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या फोनची किंमत ७३, ००० रूपये होती. माध्यमांच्या वृत्तानुसार Google Pixel 2 XL फोनच्या किंमतीमध्ये ४० टक्के कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. Google Pixel 2 XLची किंमत २७,५०१ रूपयांनी घटली आहे. मात्र, कंपनीने याची अधिकृत घोषणा केली नाही. पण ९ ऑक्टोबर रोजी Pixel 3 च्या लाँच इव्हेंटवेळी याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईतील रिटेलर महेश टेलिकॉमकडून Pixel 2 च्या किंमतीमध्ये मोठी कपात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

गुगलने काही वर्षापूर्वी मोबाईल मार्केटमध्ये एन्ट्री केली आणि अनेक बड्या कंपन्यांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अॅपल कंपीनीला टक्कर देण्यासाठी गुगलने दोन फोन लाँच केले होते. पिक्सेल २ XL या फोनमध्ये ६ इंचाची एचडी स्क्रीन आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३६ प्रोसेसर आहे. याबरोबरच ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्हीची रॅम ४ जीबी आहे. पिक्सेल २ XL मध्ये १२ मेगापिक्सेल सिंगल रिअर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. रिअर कॅमेऱ्यात फेस डिटेक्शन आणि ऑटो लेझर फोकस हे विशेष फीचर्स आहेत.