20 February 2019

News Flash

बहुप्रतीक्षित Google Pixel 3, Pixel 3 XL लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

कॅमेरा सुरू असताना हालचाल झाल्यानंतर प्रतिमा घेण्याची सुविधा

गुगलने आपले बहुप्रतीक्षित Google Pixel 3 आणि Pixel 3 XL स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. न्यू यॉर्कमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात कंपनीने विविध उपकरणांसह हे दोन स्मार्टफोन सादर केले. ब्लॅक आणि व्हाइट या दोन कलरमध्ये हे दोन्ही नवे स्मार्टफोन सादर करण्यात आले. गेल्या वर्षीच गुगलने पिक्सल 2 आणि पिक्सल 2 XL हे फोन आणले होते. पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल हे गेल्यावर्षी लॉन्च केलेल्या फोनची पुढील आवृत्ती आहे.

गुगलच्या पिक्सल मालिकेतील मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचे कॅमेरे असतात, त्याचप्रमाणे पिक्सल 3 आणि पिक्सल 3 एक्सएल या दोन्ही मॉडेलमध्ये दर्जेदार कॅमेरे देण्यात आले आहेत. याच्या समोरच्या बाजूला प्रत्येकी 8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर मागच्या बाजूला 12.2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यांमध्ये टॉप शॉट या नव्या फिचरचा समावेश करण्यात आला आहे. तसंच कॅमेऱ्यात सुपर रेझ झूप प्रदान करण्यात आला आहे. नाईट सायच्या मदतीने कमी उजेडातही चांगल्या प्रतिमा घेता येतील. तसंच कॅमेरा सुरू असताना हालचाल झाल्यानंतर प्रतिमा घेण्याची सुविधा या कॅमेऱ्यांमध्ये देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहेत. पिक्सल 3 मध्ये 2915 आणि पिक्सल 3 एक्सएलमध्ये 3430 मिलीअॅंपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या दोन्ही फोनसोबत फास्ट चार्जिंगसाठी वायरलेस चार्जरही दिलं जाईल. पिक्सल 3 या मॉडेलची 64 जीबी स्टोरेजची आवृत्ती 71 हजार, 128 जीबी व्हेरिअंट 80 हजार रुपयांना मिळेल. पिक्सल 3 एक्सएल या मॉडेलच्या 64 जीबी व्हेरिअंटची किंमत 83 हजार आणि 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 92 हजार रुपये असेल. 11 ऑक्टोबरपासून फोनसाठी आगाऊ नोंदणी सुरू होणार आहे, तर 1 नोव्हेंबरपासून विक्री सुरू होणार आहे.

Google Pixel 3 चे स्पेसिफिकेशन्स
गूगल पिक्सल 3 हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन Android 9.0 Pie वर कार्यरत असेल. यामध्ये 5.5 इंच फुल एचडी+(1080×2160 पिक्सल्स) फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले आहे. पुढील आणि मागील बाजूला कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. 443ppi के पिक्सल डेंसिटीसह यामध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले, HDR सपोर्ट आणि 100,000:1 सुपर कॉन्ट्रास्ट रेशो यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. इंटरनल स्टोरेज 64 जीबी आणि 128 स्टोरेज पर्याय मायक्रो एसडी कार्डची सुविधा नाही.
कॅमेरा -12+2 मेगापिक्सल ड्यूअल रिअर कॅमेरा सेटअप, कॅमेऱ्यात ड्यूअल पिक्सल फेस डिटेक्शन आणि ऑप्टिकल+इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलायजेशन व 76 डिग्रीचा फिल्ड ऑफ व्यू आहे. रिअर कॅमेऱ्याद्वारे युजर 30 फ्रेम प्रति सेकंद 4K व्हिडिओ रेकॉर्ड करु शकतात.

Google Pixel 3XL
Pixel 3XL स्मार्टफोनचे अधिकांश फिचर पिक्सल 3 स्मार्टफोनप्रमाणेच आहेत. दोन्ही फोनच्या डिस्प्लेचा आकार आणि बॅटरीमध्येच जास्त फरक आहे. पिक्सल 3 XL मध्ये 6.3 इंचाचा QHD+ (2960×1440 पिक्सल्स) फ्लेक्सिबल OLED डिस्प्ले आहे. यामध्ये HDR सपोर्ट आणि 100,000 : 1 कॉन्ट्रास्ट रेशो यांसारखे फिचर्स आहेत.

Google Pixel 3 प्रमुख स्पेसिफिकेशन्स – 

डिस्प्ले – 5.50 इंच
प्रोसेसर – 2.5 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमरा- 8-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल
रिजोल्यूशन – 1080×2160 पिक्सल
रॅम – 4 जीबी
ओएस – अॅन्ड्रॉइड  9.0 Pie
स्टोरेज- 64 जीबी
रियर कैमरा- 12.2-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता- 2915 एमएएच
Google Pixel 3XL प्रमुख स्पेसिफिकेशन्स – 
डिस्प्ले – 6.30 इंच
प्रोसेसर – 2.5 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा – 8-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल
रिजोल्यूशन – 1440×2960 पिक्सल
रॅम – 4 जीबी
ओएस – अॅन्ड्रॉइड 9.0 Pie
स्टोरेज – 64 जीबी
रिअर कॅमेरा – 12.2-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 3430 एमएएच

First Published on October 10, 2018 2:49 am

Web Title: google pixel 3 and pixel 3 xl launched