गुगलने आपला नवीन स्मार्टफोन Google Pixel 4a लाँच केला आहे. ‘पंच होल डिस्प्ले डिझाइन असलेला Google Pixel 4a हा फोन कंपनी मे महिन्यात ‘गुगल I/O’ इव्हेंटमध्ये लाँच करणार होती. पण, करोना महामारीमुळे कंपनीने हा इव्हेंट रद्द केला होता. या नवीन फोनद्वारे अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वी लाँच केलेल्या ‘स्वस्त’ iPhone SE 2020 स्मार्टफोनला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.

अमेरिकेमध्ये हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला असून 20 ऑगस्टपासून गुगल स्टोअर, BestBuy.com, अ‍ॅमेझॉन आणि अन्य काही स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्लिपकार्टद्वारे या फोनच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. अद्याप या फोनच्या भारतातील किंमतीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. अमेरिकेत Google Pixel 4a फोनची किंमत 349 डॉलर (जवळपास 26,300 रुपये) आहे. फोनच्या भारतातील किंमतीबाबतची घोषणा नंतर केली जाणार आहे. पण, भारतात हा फोन केवळ 4G व्हेरिअंटमध्येच  उपलब्ध होणार आहे. या नवीन फोनद्वारे अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वी लाँच केलेल्या ‘स्वस्त’ iPhone SE 2020 स्मार्टफोनला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न आहे.  iPhone SE हा अ‍ॅपलचा स्वस्त फोन असला तरी भारतात त्याची किंमत 40 हजारांच्या आसपास आहे.

फीचर्स –
Google Pixel 4A केवळ जेट ब्लॅक रंगात लाँच करण्यात आला आहे. नवीन पिक्सेल फोनमध्ये Pixel 3a च्या तुलनेत अनेक बदल झाले आहेत. सर्वात मोठा बदल फोनच्या डिस्प्लेमध्ये झाला असून नवीन फोनमध्ये कंपनीने होल-पंच डिझाइनचा वापर केलाय. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिटं सेन्सर आहे. गुगल पिक्सेल 4A अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून 5.81 इंच का फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) ओलेड डिस्प्ले आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसरसह या फोनमध्ये 12MP चा प्राइमरी कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 6GB रॅमसोबत 128GB स्टोरेज आहे, पण स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्याय यामध्ये नाहीये. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS, NFC, USB Type-C, आणि 3.5mm जॅक आहे. याशिवाय फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 3140mAh क्षमतेची बॅटरी फोनमध्ये आहे.