गुगलने आपला २०२० प्लॅगशिप स्मार्टफोम Google Pixel 5 लाँच केला आहे. या नव्याकोऱ्या पिक्सल स्मार्टफोनला Pixel 4a 5G सोबत लाँच करण्यात आलं आहे. Pixel 4a 5G हा स्मार्टफोन Pixel 4a चं 5G वर्जन आहे. Google Pixel 5 आणि Pixel 4A 5G या दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आणि Titan M सिक्योरिटी चिप आहे.

Google Pixel 5 हा स्मार्टफोनची किंमत जवळपास ५१ हजार ४०० ($699) रुपयांपासून सुरुवात होतो. तर Google Pixel 4a 5G या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ($699) रुपयांपर्यंत आहे. दोन्हीही स्मार्टफोन्स 5G मार्केट्स- ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, आयरलँड, जापान, तायवान आणि UK या देशात मिळतील.

सर्वप्रथम १५ ऑक्टोबर रोजी Pixel 4a 5G हा स्मार्टफोन जपानमध्ये लाँच करण्यात येईल. नोव्हेंबरमध्ये इतर देशांत हा स्मार्टफोन लाँच करण्यात येईल. Pixel 5 हा स्मार्टफोन १५ ऑक्टोबरपासून हा स्मार्टफोन ९ देशांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. ही स्मार्टफोन ब्लॅक आणि सोर्टा सेज या रंगात उपलबद्ध आहे. Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G हे दोन्ही स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात येणार नाहीत. याची माहिती कंपनीने ऑगस्टमध्येच दिली होती.

Google Pixel 5 चे स्पेसिफिकेशन्स –
ड्युअल-सिम (नॅनो + ई-सिम) सपोर्टवाला हा स्मार्टफोन अँड्रॉएड ११ वर चालत आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ६ प्रोटेक्शनसह ६-इंच फुल-HD+ (1,080×2,340 पिक्सल) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB LPDDR4 रॅमसह ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 765G प्रोसेसर दिलं आहे.

फोटोग्राफी आण व्हिडीओग्राफीसाठी Google Pixel 5 मध्ये रिअर ड्युअल कॅमरा सेटअप दिला आहे. याम्ये १२.२MP प्रायमरी सेंसर आणि 16MP सेकेंडरी सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेराही दिला आहे. फ्रंट आणि रियर दोन्हीही कॅमेरे 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग सपोर्ट करतात. Google Pixel 5 या स्मार्टफोन्सची इंटरनल मेमोरी 128GB आहे. फिंगरप्रिंट सेंसरसह 4,080mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 18W फास्ट चार्जिंगला हा स्मार्टफोन सपोर्ट करतो. विशेष म्हणजे या स्मार्टफोन्सला वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग दोन्हीही सपोर्ट करत आहे.

Google Pixel 4a 5G के स्पेसिफिकेशन्स
ड्युअल-सिम (नॅनो + ई-सिम) सपोर्टवाला हा स्मार्टफोन अँड्रॉएड ११ वर चालत आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह 6.2-इंचाचा फुल-HD+ (1,080×2,340 पिक्सल) OLED डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोन्समध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आहे. Google Pixel 4a 5G या स्मार्टफोनमध्ये Pixel 5G मध्ये असणारा रियर आणि फ्रंट कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. Google Pixel 4a 5G स्मार्ट फोन्सच्या तुलनेत Google Pixel 4a 5G ची बॅटरी कमी वॅटची आहे. या स्मार्टफोन्समध्ये 3800mAh बॅटरी देण्यात आली आहे.