गुगल प्ले स्टोअरमधून युजर्सच्या सुरक्षेला धोकादायक ठरणारे अॅपवर नजर ठेवून असते. तसेच असे धोकादायक अॅप तात्काळ हटवले जातात. आताही गुगलनं १७ धोकादायक अॅप प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. यामधील यातील बहुतांश ऍप हे डॉक्युमेंट स्कॅनर, फोटो आणि व्हिडीओ एडिट या संबंधात आहेत. युजर्सची माहिती चोरी करण्यासाठी हे अॅप बनवण्यात आल्याची माहिती समोर आली. Zscaler ThrearLabZ च्या संशोधनात या मालवेअरचा शोध लागला आहे. त्यानंतर गुगलने तात्काळ १७ अॅप प्ले स्टोअरवरुन उडवली आहेत.

या धोकादायक अॅप संदर्भात माहिती देताना सांगण्यात आलं की, प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलेल्या १७ अॅपध्ये विविध प्रकारचा खतरनाक मालवेअर आढळला. हे अॅप जवळपास एक लाखांपेक्षा आधिक लोकांनी डाउनलोड केला आहे. हे अॅप युजर्सचे मेसेज, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि फोनमधील अन्य खासगी माहिती चोरी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहेत. जर तुमच्या मोबाईलमध्ये खालील १७ अॅप असतील तर ते तात्काळ डिलीट करावीत…

All Good PDF Scanner

Mint Leaf Message-Your Private Message

Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons

Tangram App Lock

Direct Messenger

Private SMS

One Sentence Translator – Multifunctional Translator

Style Photo Collage

Meticulous Scanner

Desire Translate

Talent Photo Editor – Blur focus

Care Message

Part Message

Paper Doc Scanner

Blue Scanner

Hummingbird PDF Converter – Photo to PDF