गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये असंख्य अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. अँड्रॉइड युजर्ससाठी हे सर्व अ‍ॅप्स डाउनलोड करणं अगदी सोपं आहे. मात्र, हे अ‍ॅप्स इंस्टॉल करताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण, प्ले स्टोअरवरील अनेक अ‍ॅप्समध्ये धोकादायक व्हायरस आढळल्याचे प्रकार समोर आले. आता पुन्हा एकदा अशाप्रकारचे सहा अ‍ॅप्समध्ये धोकादायक मॅलवेअर आढळल्याची माहिती असून गुगलने हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले आहेत.

कोणते आहेत हे अ‍ॅप्स –
प्ले स्टोअरमधून हटवण्यात आलेल्या सहा अ‍ॅप्सपैकी चार VPN अ‍ॅप्स आहेत. यामध्ये हॉटस्पॉट व्हीपीएन, फ्री व्हीपीएन मास्टर, सिक्युअर व्हीपीएन आणि सीएम सिक्युरिटी अ‍ॅपलॉक अ‍ॅटीव्हायरस अ‍ॅप्सचा समावेश आहे. याशिवाय सन प्रो ब्यूटी कॅमेरा आणि फनी स्वीट ब्यूटी सेल्फी कॅमेरा हे दोन कॅमेरा अ‍ॅप्सदेखील डिलीट करण्यात आले आहेत. चारही VPN अँड्रॉइड अ‍ॅप्सची निर्मीती चिनमध्ये झाल्याची माहिती असून या अ‍ॅप्समध्ये मोठ्या प्रमाणात फ्रॉड जाहिरातींचाही समावेश आहे. त्यामुळे जर तुमच्या फोनमध्येही हे सहा अॅप्स असतील तर तातडीने डिलिट करा.

आणखी वाचा : ‘जंबो’ बॅटरी व 48MP सह ट्रिपल कॅमेरा सेटअप, सॅमसंगचा नवा स्मार्टफोन लाँच

कॅमेरा अ‍ॅप सर्वाधिक धोकादायक –
मोबाइल सिक्युरिटी फर्म Wandera नुसार, प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलेले दोन्ही कॅमेरा अ‍ॅप सर्वाधिक धोकादायक आहेत. हे अ‍ॅप्स युजरकडून अनेक परवानग्या मागतं, यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगची परवानगीचाही समावेश आहे.