08 March 2021

News Flash

Google चा मोठा निर्णय! ‘या’ स्मार्टफोन्सना नाही मिळणार Android 11 चा सपोर्ट

Android 11 अपडेटबाबत महत्त्वाची माहती

गुगलने स्मार्टफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Android 11 च्या बिटा व्हर्जनची टेस्टिंग सुरू केली असून लवकरच हे अपडेट सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाईल. पण, याबाबत एक महत्त्वाची माहती समोर आली आहे. 2GB किंवा त्यापेक्षा कमी रॅम असलेल्या स्मार्टफोनला Android 11 चा सपोर्ट मिळणार नाही, असं समजतंय.

XDA डेव्हलपर्स आणि जीएसएम-एरीनाच्या रिपोर्टनुसार, गुगलच्या डिव्हाइस कॉन्फिगरेशन गाइडची एक प्रत लीक झाली आहे.  त्यानुसार, अँड्रॉइड 11 ओएससाठी किमान 2जीबी रॅम असणं आवश्यक आहे. ज्या डिव्हाइसचा रॅम 2जीबीपेक्षा कमी असेल त्यावर Android 11 काम करणार नाही. त्या डिव्हाइससाठी युजर्सना ‘अँड्रॉइड गो’ ओएसवर काम करावं लागेल. याशिवाय, 512MB रॅमसोबत येणाऱ्या डिव्हाइसना यापुढे प्री-लोडेड गुगल मोबाइल सर्व्हिसही मिळणार नाही. याचा थेट गुगलने या डिव्हाइससाठी सपोर्ट बंद केला असा निघतो.

हे बदल या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत दिसू शकतात. कारण याचवेळेस कंपनीकडून गुगल अँड्रॉइड 11 अपडेट सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाणार आहे. त्यानंतर लगेच मोबाइल कंपन्या आपल्या डिव्हाइस नवीन ओएसमध्ये अपडेट करण्यास सुरूवात करतील.  आधीपासून असलेले 2जीबी रॅमचे जे डिव्हाइस जुन्या अँड्रॉइड व्हर्जनसह लाँच झाले होते, त्यांना या बदलाचा फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे. दरम्यान, ‘अँड्रॉइड गो’ ही ऑपरेटिंग सिस्टिम कंपनीने कमी फीचर्ससह लाँच केली होती. मात्र कमी फीचर्स असण्याचा याच्या मुख्य फंक्शनिंगवर जास्त परिणाम होत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:17 pm

Web Title: google will not provide support of android 11 to the phones with 2gb ram or less sas 89
Next Stories
1 येतोय नेटफ्लिक्सचा स्वस्त Mobile+ प्लॅन, वाचा किती आहे किंमत ?
2 डाळ पचायला जड जाते? मग ‘हे’ उपाय करुन पाहा
3 किंमत फक्त 7,999 रुपये, ‘या’ तारखेला Infinix च्या ‘स्वस्तात मस्त’ स्मार्टफोनचा Sale
Just Now!
X